30.9 C
Latur
Monday, May 10, 2021
Homeमहाराष्ट्रडोळा मारणेही लैंगिक छळच

डोळा मारणेही लैंगिक छळच

एकमत ऑनलाईन

मुंबई : मुंबईतील कोर्टाने एका प्रकरणात डोळा मारणे आणि फ्लाईंग किस करणे हा सुद्धा लैंगिक छळ च असल्याचा निर्णय दिला आहे. संबंधित प्रकरणात आरोपीला १ वर्षाची शिक्षा व १५ हजार रुपयांचा दंडही ठोठावला आहे. पोस्को अंतर्गत हा निकाल दिला आहे.

२९ फेब्रुवारी २०२० रोजी १४ वर्षीय पीडिता आपल्या बहिणीसोबत घराबाहेर जात असताना आरोपीने तिला डोळा मारला आणि फ्लाईंग किस केले. आरोपीच्या कृत्यामुळे मुलगी मानसिक तणावात होती. या घटनेनंतर पीडितेच्या कुटुंबियांनी एलटी मार्ग पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला. त्यानंतर पोलिसांनी तात्काळ कारवाई करत आरोपीला बेड्या ठोकल्या.

आरोपीने यापूर्वीही पीडितेबरोबर अशीच वागणूक केली होती. मुलीने याबाबत अनेकदा तिच्या आईला सांगितले होते. पीडितेच्या कुटुंबियांनी सदर तरुणाला समजही दिली होती. मात्र त्याने पुन्हा तसेच कृत्य केल्याने अखेर पोलिसांत तक्रार दिली.

आरोपीने कोर्टात पीडित मुलीच्या बहिणीसोबत ५०० रुपयांची पैज लागल्याचे कारण पुढे करत हे कृत्य केल्याचे सांगितले. मात्र पैज लावल्याचा कोणताच पुरावा मिळाला नाही. त्यामुळे कोर्टाने पीडित तरुणीच्या बाजूने निर्णय देत आरोपीला शिक्षा सुनावली. आरोपीला सुनावलेल्या १५ हजार रुपयांच्या दंडातील १० हजार रुपये पीडित मुलीला देण्यासही न्यायालयाने सांगितले आहे.

कूचबिहारमध्ये जाण्यापासून ममतांना रोखले

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,494FansLike
184FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या