25.5 C
Latur
Saturday, September 18, 2021
Homeमहाराष्ट्रबीएमसीचा अजब कारभार : मुंबईत 70 बेपत्ता कोरोना रुग्णांची यादी दिल्याने मोठी...

बीएमसीचा अजब कारभार : मुंबईत 70 बेपत्ता कोरोना रुग्णांची यादी दिल्याने मोठी खळबळ

एकमत ऑनलाईन

मुंबई : देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईत कोरोना रुग्णांची संख्या सातत्याने वाढतच आहे. त्यातच मुंबईतील मालाड पी नॉर्थ वार्डात एकूण 70 कोरोना रुग्ण बेपत्ता असल्याचं सांगत मुंबई महानगरपालिकेने त्यांची यादीच काढली . मात्र, या यादीत बीएमसीच्याच आरोग्य विभागाच्या अधिकाऱ्याचाही नंबर आल्याने बीएमसीचा अजब कारभार उघड झाला आहे. पी नार्थ वार्डाचे प्रभाग समितीचे अध्यक्ष आणि नगरसेवक विनोद मिश्रा यांनी या प्रकाराची माहिती ट्वीट करुन दिली आहे. संबंधित अधिकारी कोरोना संसर्गित नसून त्यांनी तशी चाचणीही केलेली नसताना त्यांचा संपर्क क्रमांक थेट बेपत्ता कोरोना रुग्णांच्या यादीत आल्याने हा गोंधळ समोर आला.

बीएमसीने मालाडमधील 70 कोरोना रुग्ण बेपत्ता असल्याचं सांगत त्यांचे संपर्क क्रमांक आणि यादीच काढली होती. या रुग्णांपैकी काहींचे फोन बंद आहेत, तर काहींचं घर बंद असल्याची तक्रार बीएमसीने केली आहे. तसेच मुंबई पोलिसांना या रुग्णांचा शोध घेण्यासाठी मदत मागितली. यानंतर एकच खळबळ उडाली. यावर मुंबई शहराचे पालकमंत्री असलम शेख म्हणाले होते, ‘काही लोकांशी संपर्क होत नाही हे खरं आहे. मात्र, ते पळून गेलेले नाहीत. कदाचित त्यातील काही स्थलांतरित मजूर असू शकतात किंवा इतर काही कारण असू शकेल. आम्ही पोलिसांची मदत घेत आहोत.’

मात्र, आता याच संपर्क होऊ न शकलेल्या कोरोना रुग्णांच्या यादीत कोरोना संसर्ग न झालेल्या आरोग्य विभागाच्या कर्मचाऱ्यांचा मोबाईल क्रमांक आढळल्याने या यादीवरच प्रश्नचिन्ह उपस्थित राहिले आहे. यामुळे बीएमसीचा हा गोंधळ निर्माण करणारा अजब कारभार देखील चव्हाट्यावर आला आहे. पी नार्थ वार्डाच्या या यादीत पी नार्थचे आरोग्य अधिकारी याच्या संपर्क क्रमांकाचाही समावेश आहे. विशेष म्हणजे त्यांनी कोरोना चाचणी देखील केलेली नाही.

पी नार्थ वार्डाचे प्रभाग समितीचे अध्यक्ष आणि नगरसेवक विनोद मिश्रा यांनी या प्रकाराची माहिती ट्वीट करुन दिली आहे. या यादीत अशाच प्रकारे इतरही नावं आहेत ज्याचा उपचार सुरु आहे किंवा जे उपचारानंतर बरे झाले आहेत. मालाडच्या एका पोलिसाचंही या यादीत नाव आहे. हा बीएमसीचा बेजबाबदारपणा आहे. ज्याने ही यादी बनवली आहे त्याच्यावर कारवाई व्हावी, अशी मागणी विनोद मिश्रा यांनी केली आहे.

Read More  चर्चाही झाली : सलून उघडण्यास परवानगी- विजय वडेट्टीवार

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,527FansLike
196FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या