23.1 C
Latur
Wednesday, July 6, 2022
Homeमहाराष्ट्रलसीकरण जलद करण्यासाठी बीएमसीची ‘हर घर दस्तक’ मोहीम

लसीकरण जलद करण्यासाठी बीएमसीची ‘हर घर दस्तक’ मोहीम

एकमत ऑनलाईन

मुंबई : मुंबईत कोरोना प्रतिबंधात्मक लसीकरणाला गती देण्यासाठी आणि कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी मुंबई महापालिकेने एक विशेष मोहीम हाती घेतली आहे. विशेषत: १२ ते १४ आणि १५ ते १७ वर्षे वयोगटातील मुला-मुलींचे लसीकरणाचे प्रमाण वाढवण्यासाठी मुंबईत केंद्र शासनाच्या निर्देशानुसार ‘हर घर दस्तक’ ही मोहीम राबवण्यात येत आहे. ही मोहीम दिनांक १ जून २०२२ पासून सुरू करण्यात आली आहे. दिनांक ३१ जुलै २०२२ पर्यंत ही मोहीम सुरू राहणार आहे. घराजवळच्या कोरोना लसीकरण केंद्रावर जाऊन पात्र व्यक्तींनी लस घ्यावी, यासाठी नागरिकांना मार्गदर्शन करण्यात येणार आहे.

अल्पवयीन मुलांचे प्राधान्याने लसीकरण
केंद्र सरकारच्या निर्देशानुसार, बृहन्मुंबई महानगरपालिका कार्यक्षेत्रात दिनांक १६ जानेवारी २०२१ पासून कोविड-१९ विषाणू प्रतिबंधात्मक लसीकरण सुरू करण्यात आले आहे. या अंतर्गत १८ वर्षे वयावरील सर्व पात्र नागरिकांचे पहिल्या मात्रेचे ११२ टक्के आणि दुस-या मात्रेचे १०१ टक्के लसीकरण पूर्ण करण्यात आले आहे.

चौथ्या लाटेचा संभाव्य धोका
कोविड संसर्गाच्या चौथ्या लाटेचा संभाव्य धोका लक्षात घेता, कोविड लसीकरण गतिमान करण्यासाठी आणि सामाजिक प्रतिकार क्षमता निर्माण करण्यासाठी केंद्र शासनाच्या निर्देशानुसार, बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या कार्यक्षेत्रात दिनांक १ जून २०२२ ते ३१ जुलै २०२२ पर्यंत ‘हर घर दस्तक मोहीम’ राबविण्यात येत आहे. यामध्ये १२ ते १४ वर्षे आणि १५ ते १७ वयोगटातील सर्व मुलांचे प्राधान्याने लसीकरण करण्यात येणार आहे. त्यासोबतच वृद्धाश्रमातील आणि इतर वरिष्ठ नागरिक (६० वर्षे आणि अधिक) यांना प्रतिबंधात्मक मात्रा (बूस्टर डोस) देण्याकरिता कार्यवाही केली जाणार आहे.

Stay Connected

1,567FansLike
187FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या