23.1 C
Latur
Monday, August 2, 2021
Homeमहाराष्ट्रबॉलिवूडला राजकीय पक्षाच्या संरक्षणाची गरज नाही

बॉलिवूडला राजकीय पक्षाच्या संरक्षणाची गरज नाही

एकमत ऑनलाईन

मुंबई : उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या मुंबई दौ-यावरुन सध्या राजकारण चांगलेच तापले आहे. बॉलिवूड मुंबईतून उत्तर प्रदेशात हलविण्याच्या हेतूने चाचपणी करण्यासाठी योगी आदित्यनाथ मुंबईत आल्याचे बोलले जात आहे. आदित्यनाथ यांच्या या दौ-यावर शिवसेनेकडून टीका होत असताना आता काँग्रेस नेते संजय निरुपम यांनीही या वादात उडी घेतली आहे. बॉलिवूडच्या मुद्यावरुन निरुपम यांनी शिवसेना आणि भाजपला सुनावले आहे.

बॉलिवूडला कुणीच कुठे घेऊन जाऊ शकत नाही आणि बॉलिवूडला कोणत्याही राजकीय पक्षाच्या संरक्षणाची गरजही नाही. सिनेप्रेमींनी आपल्या कष्टाने बॉलिवूडचा विराट विश्व इथे निर्माण केले आहे. त्यासाठी तब्बल १०० वर्ष खर्ची झाली आहेत. त्यामुळे नेत्यांनी बॉलिवूड शिफ्ट करण्याच्या किंवा बॉलिवूडला वाचवण्याच्या वल्गना करू नये, असे ट्विट करत निरुपम यांनी शिवसेना आणि भाजपला खडेबोल सुनावले आहेत.

योगी यांनी घेतली अक्षय कुमारची भेट
उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ सध्या दोन दिवसांच्या मुंबई दौ-यावर आहेत. मंगळवारी त्यांनी अभिनेता अक्षय कुमारची भेट घेतली होती. उत्तर प्रदेशात फिल्मसिटी निर्माण करण्याची तयारी आदित्यनाथ यांनी केली आहे. याच पार्श्वभूमीवर त्यांची अक्षय कुमारसोबत चर्चा झाली. त्यानंतर ते काही दिग्दर्शकांची देखील भेट घेणार असल्याचे कळते. आदित्यनाथ यांच्या या दौ-यावर शिवसेनेने जोरदार टीका केली आहे. योगींनी मुंबईशीच पंगा घेतला आहे का? असा सवाल शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी उपस्थित केला आहे.

हा बाळासाहेबांचा पक्ष नाही : फडणवीस

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,527FansLike
200FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या