24.4 C
Latur
Thursday, August 18, 2022
Homeमहाराष्ट्रबॉलिवूड ड्रग्जच्या आहारी गेलेल्या लोकांनी भरलेले नाही

बॉलिवूड ड्रग्जच्या आहारी गेलेल्या लोकांनी भरलेले नाही

एकमत ऑनलाईन

मुंबई : बॉलिवूडमधील काही कलाकार मंडळींचे चेहरे ड्रग्जच्या प्रकरणामध्ये समोर आले. अभिनेता सुनील शेट्टीने बॉलिवूड ड्रग्ज प्रकरणाबाबत मोठे विधान केले आहे. बॉलिवूड हे ड्रग्जच्या आहारी गेलेल्या लोकांनी भरलेले नाही या विधानाची चर्चा सध्या सोशल मीडियावर रंगत आहे.

सुनील शेट्टीने एका कार्यक्रमामध्ये हजेरी लावली होती. यादरम्यानचा एक व्हीडीओ विरल भयानीने त्याच्या इन्स्टाग्राम अकाऊंटद्वारे शेअर केला आहे. सुनील या व्हीडीओमध्ये बॉलिवूड ड्रग्ज प्रकरणाबाबत बोलताना दिसत आहे. त्याने बॉलिवूड ड्रग्ज प्रकरणाबाबत आपले मत व्यक्त करत चित्रपटसृष्टीला पाठिंबा दिला आहे. ‘‘एकाने चुकी केली की सगळे बोलतात बाकीचे देखील चोर आहेत, ड्रग्जची नशा करत आहेत.

पण असे काहीच नाही. मी ३० वर्षांपासून चित्रपटसृष्टीमध्ये काम करत आहे. माझे असे ३०० मित्र आहेत ज्यांनी संपूर्ण आयुष्यामध्ये आतापर्यंत कोणतंच व्यसन केलेलं नाही. बॉलिवूड हे ड्रग्जच्या आहारी गेलेल्या लोकांनी भरलेलं नाही. कोणाची अशी चूक झाली असेल तर त्याला लहान समजून माफ करा.

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या