24.3 C
Latur
Thursday, June 24, 2021
Homeमहाराष्ट्रबॉलीवूड संपवण्याचा डाव सहन करणार नाही

बॉलीवूड संपवण्याचा डाव सहन करणार नाही

मुख्यमंत्री ठाकरे यांचा इशारा ; बॉलिवुडमधील नामांकितांशी चर्चा

एकमत ऑनलाईन

मुंबई: मुंबई ही महाराष्ट्राची आर्थिकच नाही तर सांस्कृतिक राजधानी म्हणूनही ओळखली जाते. बॉलीवूडमुळे अनेक कलाकारांना ओळख व अनेकजणांना रोजगार मिळतो.अशा बॉलिवुडला बदनाम करुन दुस-या ठिकाणी हलविण्याचा प्रयत्न ठराविक वर्गाकडून केला जात आहे. ही बाब अत्यंत वेदनादायक आहे. बॉलीवूडला संपवण्याचे किंवा इतरत्र हलवण्याचे प्रकार कधीही सहन करणार नाही , अशा शब्दांत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी इशारा दिला आहे. मुंबईतील बॉलीवूडमध्ये हॉलीवूड सिनेमांना तोडीस तोड असे सिनेमे बनत आहेत. बॉलीवूड सिनेमांचा चाहतावर्ग जगभर आहे,असेही ठाकरे यांनी नमूद केले.

गेल्या काही दिवसांतील घटनाक्रमांकडे बोट
कोरोना संसर्गामुळे राज्यातील सिनेमागृहे गेल्या सात महिन्यांपासून बंद असून आहेत. आता अनेक निर्बंध शिथील होत असताना सिनेमागृहांची दारेही लवकरच उघडणार आहेत. या अनुषंगाने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज मल्टिप्लेक्स, सिनेमागृहे मालकांशी व्हर्चुअल यंत्रणेद्वारे चर्चा केली. मुख्यमंत्यांनी गेल्या काही दिवसांतील घटनाक्रमाकडे बोट दाखवत एकप्रकारे बॉलीवूडला सावध करण्याचे काम यावेळी केले.

बॉलिवूडमधील नामवंतांना लक्ष्य करण्याचा प्रयत्न
अभिनेता सुशांतसिंह राजपूतच्या आत्महत्येनंतर बॉलीवूडला ग्रहण लागल्यासारखीच स्थिती निर्माण झाली आहे. या प्रकरणाचा तपास सीबीआयकडे गेल्यानंतर तपासातून ड्रग्ज कनेक्शन पुढे आले. त्यात सुशांतची गर्लफ्रेंड रिया चक्रवर्तीला अटक झाली. नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोने रियाकडून मिळालेल्या माहितीनूसार अभिनेत्री दीपिका पदुकोण, सारा अली खान आणि श्रद्धा कपूर यांचीही चौकशी केली. प्रकरणात रियाला जामीन मिळाला असला तरी बॉलीवूडवरील ड्रग्जचे धुके अद्याप कायमच आहे. गेल्या काही दिवसांपासून बॉलीवूडच्या पहिल्या फळीतील कलावंत, निर्माते आणि दिग्दर्शकांना लक्ष्य करण्यात येत आहे. बॉलीवूडमध्येच यावरून दोन गट पडले आहेत. त्यात राजकीय हस्तक्षेपही पाहायला मिळत आहे. अभिनेत्री कंगना राणावतने केलेले आरोप, मीडिया ट्रायल ही बाबही चर्चेत राहिली.

योगी आदित्यनाथांची घोषणा चर्चेत
दुसरीकडे उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनीही उत्तरप्रदेशमध्ये फिल्मसिटी उभारण्याची घोषणा केली. त्यानंतर बॉलिवूड सुनियोजितपणे मुंबईच्या बाहेर हलविण्याच्या चर्चेला वेग आला आहे.

पंतप्रधान मोदींच्या संपत्तीत गेल्या वर्षीच्या तुलनेत वाढ

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,527FansLike
202FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या