मुंबई : राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी कोरोना काळात अतिशय महत्त्वाची भूमिका बजावत जनतेला आधार दिला होता. किंबहुना या आव्हानात्मक काळात ते स्वत:सुद्धा जबाबदारीने पुढाकार घेत राज्याला कोरोनामुक्तीच्या दिशेने नेताना दिसले. यातच आणखी एक महत्त्वाचा टप्पा आला, तो म्हणजे कोरोना लसीकरणाचा. देशासह राज्यातही काही दिवसांपूर्वी कोरोना लसीकरणास सुरुवात झाली. पहिल्या टप्प्यातील या लसीकरणाचा उत्साह सुरुवातीला दिसून आला. पण, आता मात्र राज्यात, लस घेण्यासाठी येणारांचा आकडा कमी झाल्याचे पाहायला मिळत आहे.आधी तू घे मग मी घेतो, अशी मानसिकता आरोग्य कर्मचा-यांमध्ये दिसत आहे. मात्र त्यांचे समुपदेशन, आयईसी केले जात आहे.
छोटे व्हीडीओ रेकॉर्ड करून सगळ्या आरोग्य कर्मचा-यांना पाठवले जात आहेत. दोन्ही वॅक्सिन सुरक्षित असून आणि वैज्ञानिकांनी खात्री दिली असल्याने वॅक्सिनेशन कार्यक्रमात सहभागी होण्याचे आवाहन आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी आरोग्य कर्मचा-यांना केले आहे. टोपे हे बुधवारी राष्ट्रवादी प्रदेश कार्यालयात जनता दरबार उपक्रमासाठी आले असता माध्यमांनी त्यांच्याशी संवाद साधला.
कोवॅक्सिन आणि कोविशील्ड या दोन्ही लसी सुरक्षित असून, त्याबाबतीत कोणताही भेदभाव नको असे आरोग्यमंत्र्यांनी अधोरेखित केले आहे. सध्याच्या लसी या पूर्णपणे चाचणी केल्यानंतरच वापरात आणल्या जात आहेत, असे सांगत त्यावर कोणत्याही प्रकारे भाष्य करणे योग्य नसेल यावर त्यांनी भर दिला. शिवाय येत्या दिवसांमध्ये इतरही काही लसी वापरात येणार आहेत. त्यामुळे लसीकरणाच्या या कार्यक्रमाकडे सकारात्मक दृष्टिकोनातून पाहत त्याला चांगला प्रतिसाद द्यावा, असे आवाहन त्यांनी नागरिकांना केले.
राज्यात ५४ टक्के लसीकरण
राज्यात आतापर्यंत ५४ टक्के लसीकरण पूर्ण झाले आहे. मुळात स्लो पध्दतीने अॅप चालत आहे. सगळ्या गोष्टीमुळे लोकांच्या मनात कन्फ्युजन असते. ते दुरुस्त करण्याचे काम केंद्र स्तरावर सुरू आहे. केंद्राच्या या गोष्टी वारंवार निदर्शनास आणून दिल्या आहेत. त्यामुळे त्यात सुधारणा होईल, असेही राजेश टोपे यांनी सांगितले. दरम्यान वॅक्सिनबाबत चुकीचे विधान माध्यमातून जाऊ नये आणि कन्फ्युजन होऊ नये याची काळजी माध्यमांनी घ्यावी, असे आवाहनही राजेश टोपे यांनी माध्यमांना केले आहे.
राज्यात लसीकरणाचा आकडा कमी झालेला आहे़ लसीकरणासाठी तयार करण्यात आलेल्या अॅपमध्येही काही तांत्रिक अडचणी येत आहेत़मुळात स्लो पध्दतीने अॅप चालत आहे. सगळ्या गोष्टीमुळे लोकांच्या मनात कन्फ्युजन असते. ते दुरुस्त करण्याचे काम केंद्र स्तरावर सुरू आहे. दरम्यान वॅक्सिनबाबत चुकीचे विधान माध्यमातून जाऊ नये आणि कन्फ्युजन होऊ नये याची काळजी माध्यमांनी घ्यावी, असे आवाहनही राजेश टोपे यांनी माध्यमांना केले आहे.
लसीकरणाबाबत जनजागृतीची गरज कोरोनालसीकरणाबाबत जनजागृतीची गरज असल्याचे म्हणत टप्प्याटप्प्याने पार पडणा-या या प्रक्रियेत योग्य वेळी मी स्वत:सुद्धा लस घेणार असल्याचे आश्वासक वक्तव्य त्यांनी केले. लस स्वत:हून जाऊन घेण्यास पूर्णपणे प्रतिसाद मिळेल असे नाही, ही वस्तुस्थिती मांडत कोणी दुस-याने आधी लस घेतल्यानंतर आपण घेऊ अशीच अनेकांची मानसिकता असल्याचे चित्र त्यांनी सर्वांपुढे ठेवले़ यावर तोडगा म्हणून राजेश टोपे स्वत: पुढाकार घेत एका व्हीडीओच्या माध्यमातून आरोग्य कर्मचा-यांना लसीकरणात सहभागी होण्याचा संदेश देणार आहेत.
चिकनवाल्यांचा व्यवसाय ७५ टक्के कोलमडला