पुणे : ब्रिजभूषण सिंह यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांना आणखी एक दणका दिला आहे. ब्रिजभूषण सिंह यांनी भारतीय कुस्ती संघाकडून एक अंतरिम समिती स्थापन केली आहे. महाराष्ट्र कुस्तीगीर परिषद चालवण्यासाठी ही अंतरिम समिती काम करणार आहे.
महाराष्ट्र कुस्ती परिषदेचे अध्यक्ष शरद पवार आहेत. मात्र सचिव बाळासाहेब लांडगे यांच्या मनमानी कारभारामुळे भारतीय कुस्तीगीर महासंघाने हस्तक्षेप करत बरखास्तीची कारवाई केली होती. त्यानंतर आज पुन्हा एकदा अंतरिम समितीची स्थापना करण्यात आली आहे.
अंतरिम समितीचे संचालक संजय कुमार सिंह, संयोजक- एस. पी. देशवाल, सदस्य- आदित्य प्रताप सिंह अशी ३ जणांची समिती स्थापन करण्यात आली. त्यामुळे शरद पवारांना आणखी एक दणका बसला आहे.