26.6 C
Latur
Thursday, August 18, 2022
Homeमहाराष्ट्रअतिवृष्टीची पंचनामे करून तातडीने उपाययोजना करा

अतिवृष्टीची पंचनामे करून तातडीने उपाययोजना करा

एकमत ऑनलाईन

मुंबई : विदर्भ आणि मराठवाड्यात पावसामुळे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. अतिवृष्टीमुळे ११५ च्या वर नागरिकांचा मृत्यू झाला. तसेच जनावरेही दगावली. पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. तेव्हा सरकारने तातडीने अतिवृष्टीचे पंचनामे करावेत व तातडीने उपाययोजना करावी, अशी मागणी राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांना केल्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी सांगितले.

राष्ट्रवादी काँग्रेसच्या शिष्टमंडळाने मंगळवारी (ता. २) दुपारी राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांची भेट घेतली. यानंतर अजित पवार यांनी पत्रकारांशी संवाद साधला. नुकसानीचे तातडीने पंचनामे करण्याची मागणी आम्ही राज्यपालांकडे केली. लवकरात लवकर पंचनामे झाले पाहिजे व पैसे दिले गेले पाहिजे, असे आम्ही म्हटले. राज्यपालांनी आमचे म्हणणे ऐकून घेतले, असे अजित पवार यांनी सांगितले.

महिना होऊनही मंत्रिमंडळ विस्तार नाही
शिंदे गट अनेक दिवसांपासून मंत्रिमंडळाचा विस्तार लवकर होणार असल्याचे सांगत आहे. दिल्लीला गेले की मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस लवकरच विस्तार होणार असल्याचे सांगत आहेत. सरकार स्थापन होऊन महिना लोटला आहे. मात्र, अद्याप मंत्रिमंडळाचा विस्तार झालेला नाही, असे ते म्हणाले.

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या