20.5 C
Latur
Friday, November 27, 2020
Home महाराष्ट्र राज्‍यपाल नियुक्‍त १२ आमदारांच्या प्रस्‍तावाला मंत्रीमंडळाची मंजुरी !

राज्‍यपाल नियुक्‍त १२ आमदारांच्या प्रस्‍तावाला मंत्रीमंडळाची मंजुरी !

नावांबाबत मात्र गुप्तता, राज्यपालांच्या निर्णयाकडे लक्ष

एकमत ऑनलाईन

मुंबई,दि.२९ (प्रतिनिधी) विधानपरिषदेच्या राज्‍यपाल नियुक्‍त १२ जागांसाठी अखेर राज्यसरकारने नावं निश्चित केली आहेत. राज्‍यपालांकडे पाठवण्यात येणाऱ्या नावांच्या प्रस्‍तावाला राज्‍यमंत्रीमंडळाच्या बैठकीत मंजूरी देण्यात आल्‍याची माहिती अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी दिली. मात्र या १२ नावांबाबत सरकारकडून कमालीची गुप्तता पाळण्यात आली असल्याने कोणाची लॉटरी लागलीय हे मात्र आज समजू शकले नाही. बंद लिफाफ्यातील नावांबाबत वेगवेगळे अंदाज व्यक्त केले जात आहेत.

विधानपरिषदेवर राज्‍यपाल नियुक्‍त म्‍हणून पाठविण्यात येणा-या १२ जागांचा प्रस्‍ताव गेल्‍या सुमारे महिन्याभरापासून चर्चेत आहे.राज्‍यपाल नियुक्‍त म्‍हणून पाठविण्यात येणारे सदस्‍य हे कला,साहित्‍य, सामाजिक कार्य, सहकार आदी क्षेत्रात काम केलेले असावेत अशी तरतूद आहे. मात्र आतापर्यंत कधी याचे काटेकोर पालन झालेले नाही. राजकीय पक्षांनी आपापल्‍या नेते, कार्यकर्त्यांची वर्णी या जागांवर लावली.

मात्र सध्या राज्यपाल व राज्यसरकारमध्ये सुरु असलेला संघर्ष पाहता राज्‍यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी या जागांच्या नेमणुकीबाबतचे सर्व नियम काटेकोरपणे तपासणार हे उघड आहे. त्‍यामुळे महाविकास आघाडीला नावं निश्चित करताना याची काळजी घ्यावी लागली आहे. या पार्श्वभूमीवर आज राज्‍यमंत्रीमंडळाने या प्रस्‍तावाला मंजुरी दिलेली असली तरी ती १२ नावे अदयापही बंद लिफाफयातच आहेत.शिवसेना,राष्‍ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस असे तीन पक्ष सत्‍तेत असल्‍याने प्रत्‍येकी ४ आमदारांचा कोटा पक्षांना मिळाला आहे.आता हा प्रस्‍ताव मंजुरीसाठी राज्‍यपाल भगतसिंह कोश्यारी यांना पाठविण्यात येईल.

कोणाची नावे चर्चेत?
शिवसेनेकडून मुख्यमंत्री उदधव ठाकरे यांचे विश्वासू स्‍वीय सचिव मिलिंद नार्वेकर,सचिन अहिर,सुनिल शिंदे यांची नावे चर्चेत आहेत.राष्‍ट्रवादी काँग्रेसकडून नुकतेच भाजपातून पक्षात आलेले ज्‍येष्‍ठ नेते एकनाथ खडसे,राजू शेटटी,आनंद शिंदे,आदिती नलावडे,शिवाजी गर्जे यांची तर काँग्रेसकडून सचिन सावंत,मोहन जोशी,नसीम खान,सत्‍यजित तांबे यांची नावे चर्चेत आहेत.

उर्मिला मातोंडकर यांना शिवसेनेकडून संधी?
अभिनेत्री उर्मिला मातोंडकर यांना शिवसेनेकडून संधी देण्यात येणार अशी चर्चा आहे.उर्मिला मातोंडकर यांच्याशी मुख्यमंत्री उदधव ठाकरे यांनी दूरध्वनीवरून चर्चा केल्‍याचेही समजते.उर्मिला मातोंडकर यांनी काँग्रेसकडून लोकसभा निवडणूक लढविली होती.त्‍यानंतर त्‍यांनी काँग्रेसच्या सदस्‍यत्‍वाचा राजीनामाही दिला होता.

नुकत्‍याच झालेल्‍या कंगना राणावत प्रकरणात मात्र त्‍यांनी मुख्यमंत्री उदधव ठाकरे तसेच महाविकास आघाडी सरकारची बाजू जोरदारपणे लावून धरली होती.कंगनाला त्‍यांनी जोरदार प्रत्‍युत्‍तर दिले होते.उर्मिला यांचे कलेच्या क्षेत्रात भरीव योगदान तर आहेच त्‍यामुळे त्‍या राज्‍यपालनियुक्‍त आमदारकीच्या निकषाला पात्र ठरतात.तसेच त्‍या मराठी आहेत.त्‍यांची राजकीय समजही खूपच चांगली आहे.त्‍यांचे वक्‍तृत्‍व आक्रमक आहे.त्‍यांचा विविध विषयांचा अभ्‍यासही चांगला आहे. त्यामुळे त्यांचे नाव चर्चेत आले आहे.

बाळाच्या जन्मापूर्वीच बारशाचे आमंत्रण !

ताज्या बातम्या

वीजबिलात सवलतची घोषणा करताना घाई, चूक झाली – अशोक चव्हाण यांची प्रांजळ कबुली

मुंबई,दि.२६ (प्रतिनिधी) लॉकडाऊनच्या काळात आलेल्या भरमसाठ वीजबिलात सवलत देण्याची घोषणा करताना उर्जामंत्री नितीन राऊत यांनी घाई केली. पक्षात आणि सरकारमध्ये घोषणा करण्याआधी चर्चा करायला...

आता सरकारला शॉक द्यावा लागेल -राज ठाकरे

मुंबई,दि.२६ (प्रतिनिधी) कोरोनाचे संकट असतानाही सरकारचे डोळे उघडावेत यासाठी आमच्यावर रस्‍त्‍यावर उतरून आंदोलन करण्याची, मोर्चा काढण्याची वेळ आली आहे. राज्‍य सरकार जर जनतेला वाढीव...

मुंबई दहशतवादी हल्ल्यातील शहीदांच्या कुटुंबियांचा राज्यपालांच्या हस्ते सन्मान !

मुंबई, दि.२६ (प्रतिनिधी) २६ नोव्हेंबर २००८ रोजी मुंबईवर झालेल्या दहशतवादी हल्ल्याला आज १२ वर्ष पूर्ण झाली. दहशतवाद्यांशी मुकाबला करताना प्राणाची आहुती देणाऱ्या वीर पोलीस...

लातूर रेल्वे बोगी प्रकल्पात फेब्रुवारीत प्रत्यक्ष उत्पादन

चाकूर : मराठवाड्याच्या विकासात महाक्रांती आणणा-या व येथील तरुणांना रोजगाराची दारे खुली करणा-या लातूर येथील मराठवाडा रेल्वे बोगी प्रकल्पाचे काम जवळपास पूर्ण झाले असून...

नव्या रेल्वे मार्गामुळे दक्षिण भाग जोडला जाणार

निलंगा : निजामकाळापासून (गेल्या ७२ वर्षांपासून) दक्षिण भाग रेल्वे मार्गाने जोडण्यासाठी धूळखात पडून असलेल्या रेल्वे मार्गाला अखेर माजीमंत्री संभाजीराव पाटील निलंगेकर यांच्या प्रयत्नांतून मंजुरी...

नौदलात दोन प्रीडेटर ड्रोन दाखल

नवी दिल्ली: चीनबरोबरच्या तणावाच्या पार्श्वभुमीवर भारताने अमेरिकेकडून दोन प्रीडेटर ड्रोन भाडेतत्त्वावर घेतली आहेत. पूर्व लडाखमध्ये प्रत्यक्ष ताबा रेषेवर ही ड्रोन तैनात केले जाण्याची शक्यता...

एक देश, एक निवडणूक ही काळाची गरज

गांधीनगर : एक देश एक निवडणूक ही देशाची गरज आहे. देशात प्रत्येक महिन्यात कोणत्या ना कोणत्या ठिकाणी निवडणुका होत असतात. यावर विचार सुरू केला...

मुंबईवर हल्ल्याचे इस्त्रायलमध्ये स्मारक

तेल अवीव: मुंबईत २००८ मध्ये झालेल्या २६/११ दहशतवादी हल्ल्यात भारतासह इतर देशांतील नागरिकांचा मृत्यू झाला होता. दहशतवादी हल्ल्यात मृत्यूमुखी पडलेल्या नागरिकांच्या स्मरणार्थ इस्रायलमध्ये एक...

लालूप्रसाद यादवांविरोधात पोलिसांत तक्रार

पाटणा : चारा घोटाळा प्रकरणातील दोषी राजदचे अध्यक्ष लालूप्रसाद यादव यांच्यापुढे नवे संकट निर्माण झाले आहे. चारा घोटाळा प्रकरणात शिक्षा भोगत असतानाही मोबाईलद्वारे बिहारच्या...

आशिया खंडात भारत लाचखोरीत अव्वलस्थानी

नवी दिल्ली : एका सर्वेक्षणातून संपूर्ण आशिया खंडात भारतात सर्वाधिक लाचखोर असल्याचे समोर आले आहे. भारतात लाचखोरीचे प्रमाण हे ३९ टक्के असल्याचे या ट्रान्सपरन्सी...

आणखीन बातम्या

वीजबिलात सवलतची घोषणा करताना घाई, चूक झाली – अशोक चव्हाण यांची प्रांजळ कबुली

मुंबई,दि.२६ (प्रतिनिधी) लॉकडाऊनच्या काळात आलेल्या भरमसाठ वीजबिलात सवलत देण्याची घोषणा करताना उर्जामंत्री नितीन राऊत यांनी घाई केली. पक्षात आणि सरकारमध्ये घोषणा करण्याआधी चर्चा करायला...

आता सरकारला शॉक द्यावा लागेल -राज ठाकरे

मुंबई,दि.२६ (प्रतिनिधी) कोरोनाचे संकट असतानाही सरकारचे डोळे उघडावेत यासाठी आमच्यावर रस्‍त्‍यावर उतरून आंदोलन करण्याची, मोर्चा काढण्याची वेळ आली आहे. राज्‍य सरकार जर जनतेला वाढीव...

मुंबई दहशतवादी हल्ल्यातील शहीदांच्या कुटुंबियांचा राज्यपालांच्या हस्ते सन्मान !

मुंबई, दि.२६ (प्रतिनिधी) २६ नोव्हेंबर २००८ रोजी मुंबईवर झालेल्या दहशतवादी हल्ल्याला आज १२ वर्ष पूर्ण झाली. दहशतवाद्यांशी मुकाबला करताना प्राणाची आहुती देणाऱ्या वीर पोलीस...

नौदलात दोन प्रीडेटर ड्रोन दाखल

नवी दिल्ली: चीनबरोबरच्या तणावाच्या पार्श्वभुमीवर भारताने अमेरिकेकडून दोन प्रीडेटर ड्रोन भाडेतत्त्वावर घेतली आहेत. पूर्व लडाखमध्ये प्रत्यक्ष ताबा रेषेवर ही ड्रोन तैनात केले जाण्याची शक्यता...

एक देश, एक निवडणूक ही काळाची गरज

गांधीनगर : एक देश एक निवडणूक ही देशाची गरज आहे. देशात प्रत्येक महिन्यात कोणत्या ना कोणत्या ठिकाणी निवडणुका होत असतात. यावर विचार सुरू केला...

मुंबईवर हल्ल्याचे इस्त्रायलमध्ये स्मारक

तेल अवीव: मुंबईत २००८ मध्ये झालेल्या २६/११ दहशतवादी हल्ल्यात भारतासह इतर देशांतील नागरिकांचा मृत्यू झाला होता. दहशतवादी हल्ल्यात मृत्यूमुखी पडलेल्या नागरिकांच्या स्मरणार्थ इस्रायलमध्ये एक...

लालूप्रसाद यादवांविरोधात पोलिसांत तक्रार

पाटणा : चारा घोटाळा प्रकरणातील दोषी राजदचे अध्यक्ष लालूप्रसाद यादव यांच्यापुढे नवे संकट निर्माण झाले आहे. चारा घोटाळा प्रकरणात शिक्षा भोगत असतानाही मोबाईलद्वारे बिहारच्या...

आशिया खंडात भारत लाचखोरीत अव्वलस्थानी

नवी दिल्ली : एका सर्वेक्षणातून संपूर्ण आशिया खंडात भारतात सर्वाधिक लाचखोर असल्याचे समोर आले आहे. भारतात लाचखोरीचे प्रमाण हे ३९ टक्के असल्याचे या ट्रान्सपरन्सी...

दिशाच्या मृत्यूचा तपास सीबीआयकडे नाहीच

मुंबई: बॉलिवूड अभिनेता सुशांतसिंह राजपूत याची माजी मॅनेजर दिशा सालियान हिच्या दिशाच्या मृत्यूचा तपास सीबीआयकडे सोपवण्यात यावा अशी याचिका कोर्टात दाखल करण्यात आली होती....

‘निवार’धडकले , पण नुकसान नाही

चेन्नई : निवार चक्रीवादळाने गुरुवारी पहाटे अंधारातच तमिळनाडू, पुद्दुच्चेरीला धडक दिली. मात्र किनारपट्टीसह अंतर्गत भागात कोणतेही नुकसान न करता पुढे गेले. भारतीय हवामान विभागाच्या...
1,347FansLike
121FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या

मोहोळ तालुक्यातील प्रेमीयुगुलांची गळफास घेऊन आत्महत्या

सोलापूर : प्रेमसंबंध घरातील व नातेवाईकांना समजेल या भीतीपोटी प्रेमी युगुलाने एकाच लिंबाच्या झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना नरखेड गुरुवारी पहाटेच्या सुमारास घडली. प्रशांत...

लातुरच्या इतिहासाचा नवा पैलू ८६ वर्षानंतर उजेडात

लातूर : तब्बल ८६ वर्षाच्या प्रतिक्षेनंतर येथील पापविनाशक मंदिरातील चालुक्य कालीन शिलालेखाच्या दोन भागांचे वाचन करण्यात आले असून त्यातून लातूर नगरीचे समृद्ध आध्यात्मिक, बौद्धिक...

अमोल जगताप आत्महत्येप्रकरणी पाच जणांना जामीन मंजूर

अमोल अशोक जगताप आत्महत्येप्रकरणी अटकेत असलेले व्यंकटेश पप्पांना डंबलदिनी वय 47 खंडू सुरेश सलगरकर वय 28 दशरथ मधुकर कसबे वय 45 लक्ष्‍मण उर्फ काका...

पानगाव ग्रामपंचायतच्या कारभाराविरोधात भीक मांगो आंदोलन

पानगाव : ग्रामपंचायतच्या ढिसाळ कारभाराचा निषेधार्थ मनसे तालुका उपाध्यक्ष तथा ग्रामपंचायत सदस्य इम्रान मणियार व मनसे शहराध्यक्ष तथा पानगाव ग्रामपंचायत सदस्य चेतन चौहान यांच्या...

काँग्रेसतर्फे सोलापुरात मोदी यांचा निषेध

सोलापुर :  मुस्लिम शासक तुघलकाप्रमाणे चित्र विचित्र निर्णय घेऊन देशाच्या अर्थव्यवस्थेची वाट लावणाऱ्या, युवकांना बेरोजगार करणाऱ्या, उद्योगधंदे बंद पाडणाऱ्या, नोटबंदीचा चुकीचा निर्णय घेणाऱ्या, सरकारी...

सुल्लाळीच्या कपीलची मालिकांमधून चमकदार कामगिरी

ओमकार सोनटक्के जळकोट : तालुक्यातील अतिशय डोंगरी भागात तिरु नदीच्या काठी सुल्लाळी हे लहानसे खेडेगाव आहे परंतु मनात जर जिद्द असेल आणि काही करून...

धक्कादायक : लातूर जिल्ह्यात कहर सुरूच : आणखी ५८ रुग्णांची भर

लातूर शहरात सापडले सर्वाधिक रुग्ण : लातूर-२५, अहमदपूर-८, निलंगा-७, औसा-६, देवणी-६, उदगीर-६ : काळजी घ्या; मास्क वापरा, गर्दीची ठिकाणे जाण्याचे टाळा लातूर : जिल्ह्यातून गुरुवारी...

६५ वर्षावरील कलाकार व क्रू सदस्यांना चित्रीकरणास परवानगी -अमित विलासराव देशमुख

सांस्कृतिक कार्य मंत्री अमित विलासराव देशमुख यांची माहिती मुंबई - चित्रपट, दूरचित्रवाणी मालिका, ओटीटी उद्योग यांच्याशी सहयोगी असलेल्या ६५ वर्षांवरील कलाकार/क्रू सदस्यांना कोविड-१९ च्या पार्श्वभूमीवर आवश्यक...