21.1 C
Latur
Tuesday, August 16, 2022
Homeमहाराष्ट्रमंत्रिमंडळाचा विस्तार ११ जुलैनंतर कधीही ; सुप्रीम कोर्टाच्या निर्णयाची प्रतीक्षा

मंत्रिमंडळाचा विस्तार ११ जुलैनंतर कधीही ; सुप्रीम कोर्टाच्या निर्णयाची प्रतीक्षा

एकमत ऑनलाईन

मुंबई : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या शपथविधीनंतर सर्वांच्या नजरा नव्या सरकारच्या मंत्रिमंडळ विस्ताराकडे लागल्या आहेत. ११ जुलै रोजी सुप्रीम कोर्टात होणा-या सुनावणीनंतर केव्हाही निकाल लागण्याची शक्यता आहे. ११ जुलै रोजी सर्व याचिकांवर सुनावणी केल्यानंतर मंत्रिमंडळाचा विस्तार होण्याची शक्यता आहे, असे सूत्राने बुधवारी (ता. ६) सांगितले.

११ जुलैला सुप्रीम कोर्टात शिवसेनेच्या १६ आमदारांच्या अपात्रतेशी संबंधित याचिकेवर सुनावणी होणार आहे. शिंदे गटाच्या नव्या पक्षाच्या व्हीपला मान्यता देण्याच्या अध्यक्षांच्या निर्णयाला उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील गटानेही आव्हान दिले आहे. लवकरच मंत्रिमंडळाचा विस्तार होणार आहे. मंत्रिपदाच्या वाटपाबाबत मुख्यमंत्र्यांशी चर्चा करणार आहे, असे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंगळवारी नागपुरात पत्रकार परिषदेत सांगितले होते.

महत्त्वाची खातेवाटप जवळपास निश्चित
सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, एकनाथ शिंदे यांच्या गटाकडे नगरविकास, महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळ (एमएसआरडीसी) हे खाते जाणार असल्याची माहिती आहे. तसेच भाजपकडे गृह, अर्थ व महसूल खाते जाणार असल्याचे समजते. यातही गृह खाते हे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आपल्याकडेच ठेवणार असल्याची सूत्रांची माहिती आहे.

मंत्रिमंडळात महत्त्वाचे खाते आपल्याकडे राहण्यासाठी रस्सीखेच पाहायला मिळते. यासाठी मोठी चर्चाही होत असते. भाजपकडे येणारे अर्थ व महसूल खाते कॅबिनेट दर्जाच्या मंत्र्यांना दिले जाणार असल्याची शक्यता आहे. तसेच भाजपच्या वाट्याला २७ तर शिंदे गटाच्या वाट्याला १४ मंत्रिपदे येणार असल्याची माहिती सूत्रांकडून प्राप्त झाली आहे.

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या