20.3 C
Latur
Sunday, December 4, 2022
Homeमहाराष्ट्रमंत्रिमंडळ विस्तार लवकरच

मंत्रिमंडळ विस्तार लवकरच

एकमत ऑनलाईन

नागपूर : गत साडे तीन महिन्यांपासून रखडलेला राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार लवकरच केल्या जाणार असल्याची माहिती राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मंगळवार दि. २५ ऑक्टोबर रोजी येथे दिली. ते दिवाळी साजरी करण्यासाठी गडचिरोली येथे आले आहेत. दरम्यान उपमुख्यमंत्री देवेन्द्र फडणवीस यांनीही मंत्रिमंडळ विस्तारावर सकारात्मक प्रतिक्रिया दिली.

राज्यातील शिंदे सरकारला तीन ते साडेतीन महिने झाले आहेत. या साडेतीन महिन्यात फक्त एकदाच मंत्रिमंडळाचा विस्तार करण्यात आला. अजूनही मंत्रिमंडळाचा संपूर्ण विस्तार करण्यात आलेला नाही. त्यामुळे मंत्रिमंडळात आपल्याला कधी संधी मिळतेय याकडे काही आमदारांचे लक्ष लागलेले आहे. परंतु, सरकारकडून या विस्तारावर काहीच भाष्य होत नसल्याने गुडघ्याला बाशिंग बांधून बसलेल्यांची चांगलीच कोंडी झाली आहे. अशातच आज थेट मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राज्याच्या मंत्रिमंडळ विस्तारावर भाष्य केले आहे. मुख्यमंत्र्यांच्या या प्रतिक्रियेमुळे मंत्रीपदाची आस धरून बसलेल्यांना मोठा दिलासा मिळाला आहे.

विस्तारात सर्वांचा विचार होणार
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे नागपुरात आले होते. त्यावेळी त्यांनी मीडियाशी संवाद साधला. योग्यवेळी सर्व गोष्टी होत राहतात, असे मुख्यमंत्री शिंदे म्हणाले. या विस्तारात विदर्भाला स्थान मिळेल का? असा सवालही त्यांना करण्यात आला. त्यावर, मंत्रिमंडळ विस्तारात सर्वांचा विचार केला जाईल असे त्यांनी स्पष्ट केले.

नक्षलवाद कमी होतोय
नक्षलवाद कमी होत चाललाय. गडचिरोलीचा विकास होतोय. उद्योग सुरु होत आहे. नक्षलवाद संपवण्यात पोलिसांचे मोठे योगदान आहे. शहरी नक्षलवादावर सरकारचं लक्ष आहे. जसे या नक्षलवादाचा बिमोड करायचा आहे, तसाच शहरी नक्षलवादाचा बिमोड करायचा आहे, असे त्यांनी स्पष्ट केले.

Stay Connected

1,567FansLike
187FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या