22.4 C
Latur
Thursday, September 29, 2022
Homeमहाराष्ट्रमहाराष्ट्रात पुन्हा सीबीआयला तपास करता येणार?

महाराष्ट्रात पुन्हा सीबीआयला तपास करता येणार?

एकमत ऑनलाईन

मुंबई : महाराष्ट्रात आता सीबीआयला तपास करायचा असेल महाराष्ट्र सरकारची परवानगी घ्यावी लागणार नाही कारण महाराष्ट्रातली सीबीआयवरील बंदी लवकरच उठवली जाणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. महाविकास आघाडी सरकारने राज्यात तपास करण्यासाठी सीबीआयला बंदी घातली होती ती उठवण्यासाठी हालचाली सुरू झाल्या आहेत.

महाविकासआघाडी सरकार सत्तेत असताना परवानगीशिवाय राज्यात सीबीआयला तपासणीचे अधिकार नव्हते. परंतु आता सत्तांतर झाल्यानंतर शिंदे आणि फडणवीस सरकारकडून सीबीआयला तपासाचे अधिकार दिले जाणार आहेत. याबद्दलचा निर्णय लवकरच मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेतला जाणार आहे, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे.

अभिनेता सुशांत सिंह राजपूत प्रकरणाचा तपास सीबीआयकडे गेला. त्यानंतर टीआरपी घोटाळ्याचा तपासही सीबीआयकडे जाण्याच्या शक्यतेमुळे महाविकास आघाडी सरकारने हा निर्णय घेतला होता. आता शिंदे-फडणवीस सरकार सत्तेत आल्यानंतर पुन्हा सीबीआयवर घातलेल्या बंदी उठवण्यासाठी हालचाली सुरू झाल्या आहेत. पंतप्रधान मोदींचे केंद्र सरकार केंद्रीय संस्थांचा दुरुपयोग करत राज्यांमध्ये विविध कारवाया करत आहे. त्यामुळे राज्यातील लोकांचा राज्य सरकारवरचा विश्वास कमी होत आहे. असे म्हणत विरोधी पक्ष केंद्र सरकारच्या विरोधात उभे ठाकले आहेत.

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या