सांगोला : पेट्रोल पंपावरील एका कामगाराने दुस-या कामगार मित्राचे कपाटाचे उघडून लॉकरमधील ५० हजार रुपयांची रोकड लंपास केली. पेट्रोल विक्रीतून जमा केलेले हे पैस होते. भावाला डबा देण्याचे निमित्त करून लॉकर परस्पर उघडून पैसे पळविल्याचा प्रकार पुढे आला आहे.
२३ जून रोजी दुपारी २ ते सायंकाळी ६च्या दरम्यान सांगोला तालुक्यात महूद येथे ऋतुराज पेट्रोल पंपावर ही घटना घडली. याबाबत सचिन मारुती कडलासकर यांनी फिर्याद दिली असून, पोलिसांनी सागर लक्ष्मण वाघमारे (रा. चिकमहूद) विरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
माळशिरस तालुक्यातील कोळेगाव येथील सचिन मारुती कडलासकर हा कामगार महूद येथील ऋतुराज पेट्रोल पंपावर काम करतो. २३ जून रोजी सकाळी ९च्या सुमारास त्याने रात्रभर
पेट्रोल-डिझेल विक्रीतून जमा झालेले १ लाख ५० हजार ७४० रुपये दुपारी २ वाजेच्या दरम्यान पंपावरील कपाटातील लॉकरमध्ये ठेवले होते. त्याची एक चावी स्वत:कडे तर दुसरी चावी कामगार सागर लक्ष्मण वाघमारे (रा. चिकमहूद) याच्याकडे दिली होती.
त्याच दिवशी सायंकाळी ६च्या सुमारास काम संपवून सचिनने कपाटाचे कुलूप उघडून लॉकरमधील पैसे बाहेर काढले. हिशेबात ५० हजार रुपये कमी असल्याचे लक्षात आले. व्यवस्थापक नवनाथ कडलासकर यांच्याकडे सागर वाघमारे यांने ड्युटी संपताना स्वत:कडील चावी पंपावर जमा केली नाही.
त्यानंतर, सागर पुन्हा पंपावर आला आणि ड्युटीवर असलेला भाऊ वैभव वाघमारे याला डबा देऊन गेला. त्यानंतर, थोड्या वेळाने सागर वाघमारे याच्याशी संपर्क साधला असता, तो नॉटरिचेबल लागला.