23.2 C
Latur
Sunday, June 26, 2022
Homeक्राइमरोकड लुटली, मोटारसायकल जाळली; चौघांवर गुन्हा

रोकड लुटली, मोटारसायकल जाळली; चौघांवर गुन्हा

एकमत ऑनलाईन

सोलापूर : पोलिसांत तक्रार केली तर रस्त्यावरच कापून टाकेन, अशी धमकी देत महिलेच्या गळ््यातील बोरमाळ, कपाटातील २५ हजार रुपये काढून घेत मोटारसायकल पळवून नेत जाळल्याप्रकरणी चौघांविरुद्ध एमआयडीसी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

वाहीद बशीर शेख, सोहेल बाबू शेख, मुज्जा व अल्ताफ (सर्व रा. सोलापूर) असे गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत. रविवार, दि. १२ जून रोजी पहाटे २ वाजेच्या सुमारास कोंडिबा बालाजी कनसाळे (३२ रा. गुरू राघवेंद्र नगर, मुळेगाव रोड) हे घरात तर त्यांची आई घराच्या पडवीत झोपलेल्या होत्या. दरवाजाजवळ पलंग लागल्याचा आवाज आल्याने कनसाळे यांनी रूममधून बाहेर येण्याचा प्रयत्न केला असता घराला बाहेरून कडी लावलेली होती.

कनसाळे यांनी खिडकीतून पडवीकडे पाहिले असता, तेथे चौघेजण उभे होते. त्यांनी कोण आहात, काय चाललंय, असे विचारल्यावर त्यांच्या आईने तोंडावर बोट ठेवून गप्प राहण्याचा इशारा केला. यानंतर सोहेलने चाकूचा धाक दाखवून कनसाळे यांच्या आईच्या गळ््यातील सोन्याची बोरमाळ तसेच त्यांच्या गळ््यातील दोरीला लावलेली कपाटाची चावी काढून घेतली.

यानंतर सोहेलने कपाटातील २५ हजार रुपये रोख काढून घेतले. यावेळी पोलिसांत तक्रार केल्यास रस्त्यावरच कापून टाकण्याची धमकीही दिली. त्यानंतर चोरटे निघून गेले. मात्र, जाताना त्यांनी कनसाळे यांची मोटायसायकलही सोबत नेली होती. पहाटे ५.४५ वाजता कनसाळे यांनी शेजा-यांना आवाज देवून घराच्या दरवाजाची कडी उघडून घेतली. दिवसभर शोध घेवूनही मोटारसायकल सापडली नव्हती.

सायंकाळी पाच वाजता त्यांच्या मित्राने ती मोटारसायकल मुळेगाव रोडवरील मोमीन नगरातील शेतकी फार्मात जळत असल्याचे सांगितले. खात्री करण्यासाठी गेल्यावर त्यांना मोटारसायकल जळालेल्या अवस्थेत आढळून आली, असे फिर्यादीमध्ये नमूद करण्यात आले आहे. या घटनेत वाहीद बशीर शेख व सोहेल बाबूू शेख यांनाा अटक झाली आहे.

Stay Connected

1,567FansLike
187FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या