Sunday, September 24, 2023

खबरदारी : हतनूर धरणाचे 36 दरवाजे पूर्ण उघडले

धरणाची पाणी पातळी 209.530 मी : 82,417 क्यूसेक पाण्याचा विसर्ग सुरु

जळगाव : जळगावातील हतनूर धरणाचे 36 दरवाजे पूर्ण उघडण्यात आले आहेत. भुसावळ तालुक्यातील हतनूर धरणाचे 36 दरवाजे आज सकाळी अर्ध्या मीटरने उघडण्यात आले होते. आता ते पूर्ण उघडण्यात आले आहेत. तर पाच दरवाजे अद्याप पूर्ण उघडण्यात आलेले नाहीत विदर्भ, मध्यप्रदेश, खान्देशात जोरदार पाऊस पडल्यामुळे हतनूर धरणाच्या पाणलोट क्षेत्रात पाण्याची आवक वाढली. त्यामुळे हतनूर धरनाचे 36 दरवाजे पूर्ण उघडण्यात आले आहेत. सध्या 82,417 क्यूसेस वेगाने पाण्याचा विसर्ग सुरु आहे. हतनूर धरणाचे शाखा अभियंता एन. पी. महाजन यांनी याबाबतची माहिती दिली आहे.गेल्या 12 तासात हतनूर धरण परीसरात 15.55 मिमी पावसाची नोंद करण्यात आली आहे. तर सध्या धरणाची पाणी पातळी 209.530 मी आहे

धरणात पाण्याची आवक वाढून जलसाठा निर्माण झाला

11 दिवसांपूर्वी 4 जुलैला हतनूर धरणाचे 6 दरवाजे सकाळी अर्धा मीटरने उघडण्यात आले होते. जळगावसह मध्यप्रदेशात पावसाने हजेरी लावल्याने तापी-पूर्णा नद्यांमधून धरणात पाण्याची आवक वाढून जलसाठा निर्माण झाला आहे. सर्वाधिक पाण्याचा प्रवाह हा पूर्णा नदीतून येत आहे. तर नदी परिसरात पाऊस सुरुच असल्याने पाण्याची आवकही वाढत आहे. त्यामुळे हतनूर प्रशासनाने धरणाचे 6 दरवाजे अर्ध्या मीटरने उघडले होते.

Read More  अभुतपुर्व कडकडीत

Related Articles

More....

लोकप्रिय बातम्या