पुणे : पुणे आणि मुंबईदरम्यान धावणा-या डेक्कन क्वीनचा आज ९३ वा वाढदिवस आहे.
डेक्कन क्वीन ही रेल्वे सुरू होऊन आज तब्बल ९३ वर्षे पूर्ण झाली. त्याच्याच मुहूर्तावर पुण्यात डेक्कन क्वीनचा वाढदिवस प्रवाशांनी मोठ्या उत्साहात साजरा केला.
मुंबई मार्गावरील सुप्रसिद्ध आणि लोकप्रिय डेक्कन क्वीन रेल्वे गेल्या ९३ वर्षांपासून सेवा देत आहे. यामुळेच आज पुणे स्टेशनवर या गाडीचा वाढदिवस साजरा करण्यात आला. पुणेकर प्रवाशांची लाडकी डेक्कन क्वीन आज ९३ वर्षांची झाल्याने प्रवाशांच्या चेह-यावर आनंदाचे वातावरण दिसून आले. १ जून १९३० रोजी ही गाडी पहिल्यांदा धावली होती.
पुणे-मुंबई प्रवास करणा-या हजारो प्रवाशांसाठी ही गाडी अत्यंत आवडीची आणि सोयीची आहे. या गाडीसोबत प्रवाशांचं अनोखं नातं गेल्या अनेक वर्षांपासून आहे. याच कारणाने ‘डेक्कन क्वीन’ एक्सप्रेसचा वाढदिवस दरवर्षी मोठ्या उत्साहात साजरा केला जातो.
९३ व्या वाढदिवसानिमित्ताने गाडी छान सजवण्यात आली होती. डेक्कन क्वीनचा वाढदिवस केक कापून साजरा करण्यात आला.