27 C
Latur
Tuesday, July 5, 2022
Homeमहाराष्ट्रकेंद्र व राज्यसरकारने शेतक-यांवर अन्याय केला

केंद्र व राज्यसरकारने शेतक-यांवर अन्याय केला

एकमत ऑनलाईन

सांगली : शेतीमालाचा दर, पुणतांब्यामधील शेतक-यांचे आंदोलन यावरुन स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे संस्थापक आणि माजी खासदार राजू शेट्टी यांनी केंद्र सरकारसोबतच राज्य सरकारवरही निशाणा साधला आहे. केंद्र सरकारने शेतक-यांवर अन्याय केला आणि राज्य सरकारने त्यांना वा-यावर सोडलं, अशी टीका राजू शेट्टी यांनी केली.

तसंच पुणतांब्यामधील शेतक-यांना दिलेल्या आश्वासनामधून फार काही निष्पन्न होणार नाही, असंही राजू शेट्टी यांनी नमूद केलं. ते सांगलीमध्ये बोलत होते.

आता सगळ्या आघाडी असो किंवा युती या सगळ्यांपासून आम्ही अलिप्त राहण्याचा निर्णय घेतलेला आहे. केंद्र सरकारने सुद्धा शेतक-यांवर अन्याय केला आहे. रासायनिक खताच्या किंमती गगनाला भिडल्या.

डिझेल प्रचंड वाढल्यामुळे उत्पादन खर्च वाढत चाललेला आहे. राज्य सरकारने शेतक-यांना वा-यावर सोडल्यागत जमा आहे आणि अशा परिस्थितीमध्ये एकाकीपणे आम्ही शेतक-यांची लढाई लढत आहोत, असं राजू शेट्टी म्हणाले.

Stay Connected

1,567FansLike
187FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या