23.4 C
Latur
Sunday, August 9, 2020
Home महाराष्ट्र केंद्र सरकारने एक ग्रॅमही दूध भुकटी आयात केलेली नाही-देवेंद्र फडणवीस

केंद्र सरकारने एक ग्रॅमही दूध भुकटी आयात केलेली नाही-देवेंद्र फडणवीस

राजू शेट्टी हे आता सरकारी आंदोलक झाले : दूध भुकटीच्या आयातीबाबत करण्यात येत असलेल्या आरोपांना प्रत्युत्तर

मुंबई – दूध दरवाढीच्या मुद्यावरून आज राज्यात सुरू असलेल्या शेतकऱ्यांच्या आंदोलनामध्ये राज्यातील विरोधी पक्ष असलेला भाजपाही आक्रमकपणे उतरला आहे. राज्यातील अनेक भागात भाजपाच्या नेत्यांनी आंदोलनात सहभाग नोंदवला. दरम्यान, राज्यातील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनीही आंदोलनात सहभाग घेत राज्यातील महाविवास आघाडी सरकारवर जोरदार टीका केली. देवेंद्र फडणवीस यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना महाविकास आघाडीच्या नेत्यांकडून दूध भुकटीच्या आयातीबाबत करण्यात येत असलेल्या आरोपांनादेखील प्रत्युत्तर दिले.

महाविकास आघाडीचे नेते केंद्र सरकारने दूध भुकटीची आयात केल्याचा आरोप करत आहेत. मात्र केंद्र सरकारने एक ग्रॅमही दूध भुकटी आयात केलेली नाही. यावेळी फडणवीस यांनी शेतकरी नेते राजू शेट्टी यांच्यावरही टीका केली. राजू शेट्टी हे आता सरकारी आंदोलक झाले आहेत, असा टोला त्यांनी लगावला.

दरम्यान, दूध दरवाढीसह इतर मागण्यांसाठी राज्यातील दूध उत्पादक शेतकरी आक्रमक झाले आहेत. शेतकरी संघर्ष समितीने दिलेल्या इशाऱ्यानुसार राज्यातील विविध भागात आज पहाटेपासूनच आंदोलनाला सुरुवात झाली आहे. अनेक ठिकाणी दुधाचे टँकर अडवले असून, महाविकास आघाडी सरकारच्या प्रतिकात्मक दगडाला अभिषेक करून तसेच ग्रामदेवतांना दुग्धाभिषेक घालून शेतकऱ्यांनी सरकारचा निषेध केला आहे. तसेच दुधाला प्रतिलिटर १० रुपये अनुदान देण्याची मागणी केली.

Read More  ४ महिन्यांत तब्बल २.५ हजार कोटी बुडाले!

राज्यातील औरंगाबाद, जालना, अमरावती, सांगली, अकोला, पंढरपूर, पुणे आदी भागात आंदोलनाला सुरुवात झाली आहे. दरम्यान, या दूध आंदोलनामध्ये महायुतीमधील घटक पक्षही सभागी झाले आहेत. शेतकऱ्यांच्या गाई व म्हशीच्या दुधाला व शेत मालाला रास्त भाव मिळावा यासाठी मागणीसाठी शिंदखेडा येथे आमदार जयकुमार रावल याच्या आदेशान्वये कामराज निकम याच्या अध्यक्षतेखाली आंदोलन करण्यात आले. तर सोलापूरमध्ये महायुतीच्या वतीने वाघोली (ता. मोहोळ) येथे महादेवाला दुग्धाभिषेक घालून व गरजूंना दूध वाटप करून आंदोलन सुरू करण्यात आले.

दूध उत्पादकांना प्रति लिटर दुधामागे दहा रुपये अनुदान मिळावे तसेच दूध पावडरला पन्नास रुपये अनुदान मिळावे या मागणीसाठी भाजपच्या वतीने आज नाशिकमध्ये विविध ठिकाणी आंदोलन करण्यात आले. मुंबई आग्रा महामार्गावर दहावा मैल येथे रास्ता रोको आंदोलन करून वाहतूक अडविण्यात आली. दूध किटली घेऊन आंदोलन करणाऱ्या कार्यकर्त्यांनी दुधाला अनुदान मिळालेच पाहिजे तसेच महा विकास आघाडीच्या धोरणाचा निषेध केला.

Read More  सुप्रीम कोर्ट : क्वारंटाईनची सुटी समजून वेतन कापता येणार नाही

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,140FansLike
93FollowersFollow