मुंबई : काश्मिरमध्ये २० पोलिसांची हत्या होते मात्र देशाच्या गृहमंत्र्यांना त्याची पर्वा नाही, काश्मीरमधील स्थिती नियंत्रणाबाहेर गेली असताना देशातील केंद्र सरकार सत्तेची आठ वर्ष साजरी करण्यात व्यस्त आहे. काश्मीर रक्तबंबाळ असताना सत्तेची आठ वर्ष कसली साजरी करताय, असा खोचक सवाल शिवसेना खासदार संजय राऊत यांनी केला आहे. आज ते मुंबईत बोलत होते.
सध्या काश्मीर धुमसत आहे. जम्मू-काश्मीरमध्ये टार्गेट किलिंगच्या घटना वाढल्या आहेत. मात्र केंद्राचे याकडे दुर्लक्ष होत आहे. यासंदर्भात राऊत म्हणाले, काश्मीरची सध्याची परिस्थीती गंभीर आहे. काश्मीर रक्तबंबाळ असताना केंद्रातील भाजप सरकार मात्र सत्तेची आठ वर्ष साजरी करत आहे. मात्र, असे असले तरी शिवसेना पूर्ण ताकतीने काश्मिरी पंडितांच्या पाठीशी उभी आहे, असं आश्वासनही राऊतांनी दिलं आहे.
पुढे ते म्हणासे, १५ जूनच्या आयोध्या दौ-याचा आढावा घेण्यासाठी आज अयोध्येला जाणार आहे. आयोध्या दौ-यात राजकारण होणार नाही. काश्मीर जळत आहे आणि दिल्लीतले राज्यकर्ते चित्रपट प्रमोशनमध्ये गुंग आहेत, असा टोलाही त्यांनी लगावला आहे. काश्मिरी नागरिकांच्या अक्रोशाकडे केंद्र सरकारचा दुर्लक्ष करत आहे. येथे होणारा काश्मिरी पंडितांचा आक्रोश केंद्र सरकाराच्या कानामध्ये जात नाही का? असा सवालही खासदार राऊत यांनी केला आहे.