26.7 C
Latur
Friday, December 3, 2021
Homeमहाराष्ट्रराज्य महिला आयोगाच्या अध्यक्षपदी चाकणकर

राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षपदी चाकणकर

एकमत ऑनलाईन

मुंबई : गेल्या अनेक महिन्यांपासून रिक्त असलेल्या राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षपदावर राष्ट्रवादी काँग्रेसच्या रुपाली चाकणकर यांची अखेर नियुक्ती झाली आहे. याबद्दल राज्य सरकारने अधिकृत घोषणा केली आहे. राज्य सरकारने याबद्दल आज अधिसूचना काढली. उद्या त्या महिला आयोगाचा पदभार स्वीकारणार आहेत.

चित्रा वाघ यांनी राष्ट्रवादीला रामराम ठोकल्यानंतर रुपाली चाकणकर यांना बढती मिळाली होती. त्यांनी या संधीचे सोने करत वेळोवेळी भाजपवर चांगलाच हल्लाबोल केला. भाजपकडून चित्रा वाघ आणि रुपाली चाकणकर यांच्यात अनेक वेळा शाब्दिक युद्धसुद्धा पाहायला मिळाले. अलीकडेच चाकणकर यांची महिला आयोगाच्या अध्यक्षपदासाठी निवड झाल्याची बातमी समोर आली, तेव्हाही चित्रा वाघ यांचा चांगलाच तिळपापड झाला. यावरून चित्रा वाघ यांनी ट्विट करत महिलांचे शील भ्रष्ट करणारे रावण राजरोस फिरताहेत पण राज्य महिला आयोगाला अद्याप अध्यक्ष नाही हे लाजिरवाणे आहे.

अध्यक्ष लवकर नेमावा, असे म्हटले होते. एवढेच नव्हे, तर महिलांच्या क्षेत्रात काम करणारी कोणी अनुभवी मिळत नसेल तर किमान रावणाला मदत करणारी ‘शुर्पणखा’ बसवू नका अन्यथा प्रत्येकवेळी सरकारचेच नाक कापले जाईल, असे वादग्रस्त ट्विट केले होते. त्यावरून आरोप-प्रत्यारोपाच्या फैरी झडल्या होत्या. अखेर चाकणकर यांचीच अध्यक्षपदी निवड झाली.

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,527FansLike
193FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या