31.8 C
Latur
Saturday, April 1, 2023
Homeमहाराष्ट्रविदर्भ, मराठवाडा आणि उत्तर महाराष्ट्रात गारपिटीची शक्यता

विदर्भ, मराठवाडा आणि उत्तर महाराष्ट्रात गारपिटीची शक्यता

एकमत ऑनलाईन

मुंबई : राज्यातील शेतकऱ्यांसाठी एक चिंताजनक बातमी असून भारतीय हवामान विभागाने उद्यापासून पुढील चार दिवस राज्यात अवकाळी पावसाचा इशारा दिला आहे. मध्य महाराष्ट्रात १५ आणि १६ मार्च रोजी अवकाळी पावसासह गारपिटीचा इशारा देण्यात आला असून यात धुळे, जळगाव आणि नाशकात काही ठिकाणी १५ मार्च रोजी गारपिटीची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. तर मराठवाडा आणि विदर्भात १६ आणि १७ मार्च रोजी गारपिटीची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

मुंबईतील सांताक्रुज हवामान केंद्रावर आज ३७.४ अंश सेल्सिअस कमाल तापमानाची नोंद करण्यात आली आहे. राज्यात उद्यापासून तापमानात घट दिसण्याची शक्यता आहे. दोन ते चार अंश सेल्सिअसने कमाल तापमानात घट नोंदवली जाणार असल्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

कोकणात देखील काही ठिकाणी हलक्या पावसाची शक्यता वर्तवली आहे. पालघर जिल्ह्यात पुढील दोन दिवस वादळी वारा, मेघ गर्जनेसह तुरळक ठिकाणी हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. १४ ते १६ मार्च, दरम्यान पालघर जिल्ह्यात तुरळक ठिकाणी मेघ गर्जना व वादळी वाऱ्यासह हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता असल्याने तयार झालेल्या भाजीपाला, फळे आणि रब्बी पिकांची काढणी करून सुरक्षित ठिकाणी ठेवावी. वादळी वाऱ्यामुळे नवीन लागवड केलेली फळांची झाडे तुटून पडण्याची शक्यता असते.

१५ मार्च : जळगाव, नाशिक, धुळे
१ं६ मार्च : जळगाव, अहमदनगर, औरंगाबाद, पुणे, अकोला, अमरावती, बुलढाणा, वर्धा, वाशिम आणि यवतमाळ
१७ मार्च : चंद्रपूर, गडचिरोली, वर्धा, वाशिम, यवतमाळ

Stay Connected

1,567FansLike
183FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या