26.9 C
Latur
Monday, June 14, 2021
Homeमहाराष्ट्रमराठवाड्यात जोरदार पावसाची शक्यता

मराठवाड्यात जोरदार पावसाची शक्यता

एकमत ऑनलाईन

पुणे : पुढील काही तासात मराठवाड्यातील सर्व जिल्ह्यांत पाऊस पडण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे. लातूर, बीड, औरंगाबाद, जालना, नांदेड, परभणी, हिंगोली जिल्ह्यांत काही ठिकाणी विजांच्या कडकडाटासह जोरदार पाऊस पडू शकतो, असे सांगण्यात आले. तसेच पश्चिम विदर्भातील जिल्ह्यांतही पाऊस पडू शकतो. पश्चिम विदर्भातील अकोला, यवतमाळ, वाशिम आणि बुलढाण्यात विजांच्या कडकडाटासह हलका ते मध्यम स्वरुपाचा पाऊस पडण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली. दरम्यान, मराठवाड्यातील नांदेड, हिंगोली, परभणी जिल्ह्यांत आज जोरदार पाऊस झाला. तसेच यवतमाळ, वाशिम, अकोला जिल्ह्यांतही पावसाने दमदार हजेरी लावली.

मराठवाड्यात सर्वच जिल्ह्यांत जोरदार पाऊस पडण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे. मात्र, लातूर, उस्मानाबाद वगळून अन्य जिल्ह्यांत पावसाने हजेरी लावली. त्यातल्या त्यात नांदेड, परभणी, हिंगोली जिल्ह्यांत सलग दुस-या दिवशी गुरुवारीही जोरदार पाऊस झाला. अन्य जिल्ह्यांतही पाऊस हजेरी लावण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे.

यवतमाळ जिल्ह्यात पूल पाण्याखाली
दरम्यान, पश्चिम विदर्भातही आज पावसाने हजेरी लावली असून, यवतमाळ जिल्ह्यातील महागाव तालुक्यात जोरदार पाऊस झाल्याने गुंज बस स्थानकाजवळील पूल पाण्याखाली गेला. त्यामुळे पुसद-महागाव-माहूर या तीन मार्गांचा संपर्क तुटला. त्यामुळे वाहनांच्या रांगा लागल्या आहेत. बस स्थानक परिसरामध्ये पुलाचे बांधकाम २ महिन्यांपासून सुरू होते. पुलाच्या दोन्ही बाजूने मातीचे बांध टाकले होते. मात्र आज आलेल्या जोरदार पावसाने याच पुलाच्या जवळील बांधवरील माती वाहून गेली. त्यामुळे गुंज गावातील मुख्य वाहतूकीचा मार्ग बंद झाला.

मुंबईत पाऊस सुरूच
दक्षिण-पश्चिम मान्सूनचे बुधवारी मुंबई व उपनगरांत जोरदार आगमन झाले. त्यामुळे शहरातील अनेक भागांत पाणीच पाणी साठले. त्यामुळे रस्ते आणि रेल्वे वाहतूकही खोळंबली होती. त्यातच आज गुरुवारीही पाऊस सुरू होता. दरम्यान, पुढील ५ दिवस मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. त्यामुळे मुंबईत रेड अलर्ट जारी करण्यात आला.

समुद्रही खवळला
मान्सूनमुळे आता समुद्रानेही रौद्ररूप धारण केले आहे. आज सकाळपासून समुद्र खवळलेला दिसत असून, समुद्राच्या लाटांचे रौद्ररूप किनारपट्टी भागात पाहायला मिळत आहे. या पार्श्वभूमीवर एनडीआरएफची १५ पथके किनारपट्टी भागात तैनात करण्यात आली आहेत.

..तर पक्षावर वाईट परिस्थिती ओढवेल; ज्येष्ठ कॉंग्रेस नेते सिब्बल यांचा सूचक इशारा

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,527FansLike
201FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या