27.4 C
Latur
Wednesday, October 5, 2022
Homeमहाराष्ट्रराज्यात पावसाची उघडीप

राज्यात पावसाची उघडीप

एकमत ऑनलाईन

पुणे : राज्यात पावसाने उघडीप दिली आहे. काही ठिकाणी हलका ते मध्यम स्वरुपाचा पाऊस पडत आहे. मुंबईसह परिसरात पावसाने चांगलीच हजेरी लावली आहे. दरम्यान, बुधवार दि. २४ ऑगस्टपासून राज्यात पावसाची स्थिती काय असू शकते याबाबतचा अंदाज ज्येष्ठ हवामान तज्ज्ञ माणिकराव खुळे यांनी सांगितला आहे. बुधवारपासून राज्यात पावसाची काहीशी उघडीप मिळू शकते असा अंदाज खुळे यांनी व्यक्त केला आहे. राज्यात तुरळक ठिकाणी हलका पाऊस पडण्याचा अंदाज त्यांनी वर्तवला आहे.

संपूर्ण मराठवाड्यातील ८ जिल्ह्यात अगदीच तुरळक ठिकाणी किरकोळ पाऊस पडण्याचा अंदाज माणिकराव खुळे यांनी व्यक्त केला आहे. याव्यतिरिक्त पुढील आठवडाभर म्हणजे सोमवार दि. २९ ऑगस्टपर्यंत पावसाची उघडीप मिळू शकते असा अंदाज त्यांनी वर्तवला आहे. तर मध्य महाराष्ट्रातील खान्देश ते सोलापूर पर्यंतच्या १० जिल्ह्यात ऑगस्ट) तुरळक ठिकाणी किरकोळ पावसा व्यतिरिक्त उघडीपच जाणवेल अशी माहिती ही खुळे यांनी दिली आहे.

विदर्भात हलक्या सरी
विदर्भात पुढील ३ दिवस तुरळक ठिकाणी हलक्या पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. शुक्रवारपासून पुन्हा तिथे मध्यम ते मुसळधार पावसाची शक्यता जाणवत असल्याची माहिती खुळे यांनी दिली. बंगालच्या उपसागरात चक्री वादळ निर्मितीच्या तिस-या अवस्थेतील समुद्रावरील हवेचा दाब म्हणजे तयार झालेले डिप डिप्रेशन, ओरिसा-बंगाल पूर्व किनारपट्टी ओलांडून देशाच्या भू-भागावर येताच आग्नेयकडून वायव्येकडे मार्गस्थ झाले. त्यामुळे ओरिसा पश्चिम बंगाल, झारखंड, मध्य प्रदेश, सध्या राजस्थान या राज्यांना जोरदार पावसाने झोडपत तिथे पुरस्थिती निर्माण झाली आहे.

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या