25.2 C
Latur
Tuesday, November 29, 2022
Homeमहाराष्ट्रचंदा कोचर यांना धक्का

चंदा कोचर यांना धक्का

एकमत ऑनलाईन

मुंबई : आयसीआयसीआय बँकेने रखडवलेल्या आर्थिक भत्यांबाबतच्या निर्णयात हस्तक्षेप करण्यास स्पष्ट नकार मुंबई उच्च न्यायालयाने गुरुवारी देत बँकेच्या माजी मुख्य कार्यकारी अधिकारी चंदा कोचर यांना दणका दिला. त्यांना पदावरून हटवण्याचा बँकेचा निर्णय वैध असल्याचे निरीक्षणही नोंदवत खंडपीठाने कोचर यांची याचिका सपशेल फेटाळून लावली.

आता ईडीला कोचर त्यांच्या मालमत्तावर जप्तीची कारवाई सुकर झाली आहे. न्या. रियाज छागला यांनी यासंदर्भातील दाव्यावर राखून ठेवलेला निकाल गुरुवारी जाहीर केला. ज्यात बँकेचा अर्ज कोर्टाने मंजूर केला करीत कोचर यांना मिळालेल्या ६ लाख ९० हजार शेअर्सवर कोणताही व्यवहार करण्यासाठी मनाई केली. जर यावर व्यवहार करायचा असेल तर प्रतिज्ञापत्रात तपशील दाखल करा, असे आदेश न्यायालयाने कोचर यांना दिले. सहा आठवड्यांत प्रतिज्ञापत्रावर मालमत्ता जाहीर करण्याचे निर्देशही न्यायालयान कोचर यांना दिले. चंदा कोचर यांनी चुकूच्या हेतूने हा दावा दाखल केल्याचा ठपकाही न्यायालयाने निकालात ठेवला आहे.

काय आहे प्रकरण?
आयसीआयसीआय बँकेच्या माजी सीईओ चंदा कोचर यांची पदावरील नियुक्ती रद्द करण्यासाठी बँकेने दावा दाखल केला होता. कोचर यांना बँकेने जानेवारीमध्ये पदावरुन हटविण्याचा निर्णय जाहीर केला होता. बँकेने त्यांचे २००९ ते २०१८ या कालावधीतील आर्थिक भत्तेही रोखून ठेवले होते. त्याला चंदा कोचर यांनी हायकोर्टात आव्हान दिले होते.

Stay Connected

1,567FansLike
187FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या