25.5 C
Latur
Saturday, September 18, 2021
Homeमहाराष्ट्रखडसेंबाबत चंद्रकांत पाटलांना अजुनही आशा

खडसेंबाबत चंद्रकांत पाटलांना अजुनही आशा

एकमत ऑनलाईन

कोल्हापूर: भाजपचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे घटस्थापनेच्या मुहूर्तावर राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करणार असल्याची जोरदार चर्चा असली तरी भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांना तसे वाटत नाहीे. एकनाथ खडसे यांच्या बाबतीत सर्व काही एक-दोन आठवड्यात सुरळीत होईल, असे आशादर्शक विधान चंद्रकांत पाटील यांनी केले आहे.

पक्षाने सातत्याने डावलल्यामुळे नाराज असलेले खडसे लवकरच राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करणार असल्याची सूत्रांची माहिती आहे. खडसे यांनी याबाबत अद्याप दुजोरा दिलेला नसला तरी त्यांच्या पक्षांतराची तयारी झाली असून त्यांना कृषिमंत्री पदही देण्यात येईल, अशी खात्रीशीर वक्तव्ये महाविकास आघाडीच्या नेते व प्रसार माध्यमांमधून केली जात आहेत. राष्ट्रवादीकडून त्यांना पक्ष संघटनेत मोठी जबाबदारी दिली जाणार असून त्यानंतर विधान परिषदेची आमदारकी दिली जाणार आहे, काही दिवसांनी मंत्रीपदही देण्यात येईल, अशी चर्चा आहे.

या पार्श्वभूमीवर पत्रकारांनी गुरुवारी चंद्रकांत पाटील यांना खडसेंच्या पक्षांतराविषयी विचारले. त्यावर, असं काहीही होणार नसल्याचा विश्वास पाटील यांनी व्यक्त केला. एकनाथ खडसे यांच्याबाबत पक्षात सकारात्मक चर्चा सुरू आहे. एक दोन आठवड्यात सर्व सुरळीत होणार आहे. मी स्वत: नाथाभाऊंशी बोलतो आहे, अशी माहिती पाटील यांनी दिली.

एकनाथ खडसे हे पक्षाला खूप मानतात. तुम्ही मीडियातून बोलू नका अशी विनंती मी त्यांना केली आहे. त्यांनी देखील ते मान्य केले आहे, अशी पुस्तीही पाटील यांनी जोडली आहे.

संजय राऊत मोठे विद्वान
मंदिरे उघडण्याच्या मुद्द्यावरून त्यांनी शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांच्यावर टीका केली. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहिणारे राज्यपाल कोशयारी हे संविधानातील सेक्युलॅरिझम मानत नाहीत का, असा प्रश्न राऊत यांनी केला होता. त्यावर, सर्वधर्मसमभावमध्ये हिंदू धर्म येत नाही का?, असा प्रतिप्रश्न पाटील यांनी केला. ‘आम्ही केवळ मंदिरे उघडा असे म्हटले नाही. सगळीच प्रार्थनास्थळ उघडा अशी आमची मागणी आहे. संजय राऊत हे फार विद्वान आहेत, असा टोला त्यांनी हाणला.

केरळमधील सोने तस्करीत दाऊदचा सहभाग

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,527FansLike
196FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या