पालघर : लॉकडाऊनमध्ये चोर समजून पालघर जिल्ह्यातील गडचिंचले येथे दोन साधू आणि वाहन चालकाची जमावाकडून निर्घृण हत्त्या करण्यात आली होती. या हत्ये प्रकरणी बुधवारी डहाणू न्यायालयात १२६ आरोपीं विरोधात आरोपपत्र दाखल करण्यात आले असून यामध्ये पोलीस उपअधिक्षक विजय पवार यांनी ४९९५ पानांचे तर उपअधिक्षक इरफान शेख यांनी ५९२१ पानांचे अशी दोन आरोपपत्र डहाणू न्यायालयात दाखल केली आहेत. ही माहिती राज्य गुन्हे अन्वेषण विभागाकडून देण्यात आली असून याप्रकरणी अधिक तपास सुरु असल्याचेही सांगण्यात आले आहे.
पालघर जिल्ह्यातील गडचिंचले येथे दोन साधू आणि वाहन चालकाची जमावाकडून निर्घृण हत्त्या करण्यात आली होती. याप्रकरणी दोन पोलीस अधिकाऱ्यांवर निलंबनाची कारवाई तर ३५ पोलिसांच्या बदल्या करण्यात आल्या होत्या. त्यानंतर हे प्रकरण सीआयडीकडे सोपवण्यात आलं आणि त्यानंतर तत्कालीन पालघर पोलीस अधिक्षक यांना ही सक्तीच्या रजेवर पाठविण्यात आले होते.
संपूर्ण प्रकरणाचा तपास २१ एप्रिलपासून राज्य गुन्हे अन्वेषण विभागाकडे सोपविण्यात आला. याचे नेतृत्व पोलीस अधीक्षक मारुती जगताप हे पाहत होते. याप्रकरणी ८०८ संशयित आणि १०८ साक्षीदारांकडे तपास करून ताब्यात घेऊन तपासाला सुरुवात झाली. याप्रकरणी १६५ जणांना अटक करण्यात आली होती. यामध्ये ११ अल्पवयीन मुलांचा समावेश होता. यापैकी कुणालाही जामीन मंजूर झालेला नाही.
Read More पालघर हत्याकांडातील १०१ आरोपींची नावे जाहिर
Read More पालघर हत्याकांडातील आरोपींची ड्रोनद्वारे शोध मोहिम
Read More पालघर हत्याकांडाचे राजकारण करु नका : शरद पवार