30.6 C
Latur
Friday, May 14, 2021
Homeमहाराष्ट्रकराडचे चारुदत्त साळुंखे यूपीएसी आयईएस परीक्षेत देशात प्रथम

कराडचे चारुदत्त साळुंखे यूपीएसी आयईएस परीक्षेत देशात प्रथम

एकमत ऑनलाईन

सातारा : ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना योग्य मार्गदर्शन मिळाले तर ग्रामीण भागातील विद्यार्थी देखील इतिहास घडवू शकतात़ याचेच मूर्तीमंत उदाहरण म्हणजे चारुदत्त साळुंखे. कराडच्या चारुदत्त साळुंखे याने यूपीएससी-आयईएस परीक्षेत देशात प्रथम येत विजयी पताका लावली आहे. सर्वसामान्य घरातून आलेला चारुदत्त ग्रामीण भागातील मुलांसाठी आदर्श आहे.

मूळचे चाफळ (ता. पाटण जि. सातारा) सारख्या ग्रामीण भागातील रहिवासी असणा-या आणि प्राथमिक शिक्षण आदर्श प्राथमिक विद्यामंदिर कराड येथून पूर्ण करुन इयत्ता दहावीपर्यंतचे शिक्षण शिवाजी हायस्कूल कराड येथून दहावीला ९४़५५ टक्के गुणांसह उत्तीर्ण करणा-या चारुदत्त साळुंखे याची यशोगाथा ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना निश्चीतच प्रेरणादायी आहे.

खासगी संस्थेत क्लर्क असणा-या मध्यमवर्गीय मोहनराव साळुंखे आणि प्राथमिक शिक्षक असणा-या संगिता साळुंखे यांचा मुलगा चारुदत्त साळुंखे याने दहावीच्या परीक्षेत सर्वोत्तम गुण घेऊन शैक्षणिक वाटचालीस सुरुवात केली. दहावीनंतर कराड येथून ९२.३३ टक्क्यांसह विज्ञान शाखेतून बारावी पुर्ण केली, बारावी विज्ञान शाखेतूनच एमएचटी-सीईटी परीक्षेत १८४ गुण मिळवून कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग पुणे या अटॉनॉमस कॉलेजमध्ये मेकॅनिकल इंजिनिअरिंगची पदवी विशेष प्राविण्यासह प्राप्त केली.

कुंभमेळ्यात १०२ भाविकांना कोरोना

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,495FansLike
186FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या