22.4 C
Latur
Thursday, September 29, 2022
Homeमहाराष्ट्रछत्रपती शिवाजीराजे भोसले यांचे निधन

छत्रपती शिवाजीराजे भोसले यांचे निधन

एकमत ऑनलाईन

राजघराण्यातील संयमी व्यक्तिमत्त्व हरपले
सातारा : साता-याच्या राजघराण्यातील शांत आणि संयमी व्यक्तिमत्व अशी ओळख असणा-या शिवाजीराजे भोसले यांचं पुण्यातील जहांगीर रुग्णालयात निधन झालं आहे. राज्यसभा खासदार उदयनराजे भोसले आणि आमदार शिवेंद्रराजे भोसले यांचे ते काका होते. शिवाजीराजे भोसले यांनी सातारा शहराचे नगराध्यक्षपददेखील भूषविले होते.

सातारा जिल्ह्यात ज्यावेळी उदयनराजे भोसले आणि शिवेंद्रराजे भोसले यांच्यातील वाद टोकाला गेले, त्यावेळी राजघराण्यातील वैरत्व संपवण्यामध्ये त्यांनी महत्त्वाची भूमिका बजावली होती. शिवाजीराजे भोसले यांच्या निधनामुळे सातारा राजघराणे आणि सातारकरांवर दु:खाचा डोंगर कोसळला आहे.उदयनराजे भोसले यांचे चुलते छत्रपती शिवाजीराजे भोसले यांचे वृध्दापकाळाने निधन झाले आहे. पुणे येथील जहांगीर हॉस्पिटलमध्ये त्यांच्यावर उपचार सुरु होते. उपचारादरम्यान आज सायंकाळी ५.४५ वाजता प्राणज्योत मालवली.

शिवाजीराजे भोसले यांचे पार्थिव रात्री उशिरा अदालत वाडा येथे आणला जाणार आहे. त्यांच्या पार्थिवावर उद्या अंत्यसंस्कार होणार आहेत. शिवाजीराजे भोसले यांनी अनेक वेळा खासदार उदयनराजे भोसले आणि आमदार शिवेंद्रराजे भोसले यांच्यात मनोमिलन केले होते.

 

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या