22.1 C
Latur
Monday, August 8, 2022
Homeमहाराष्ट्रमुलांच्या आठवणीत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे भावूक

मुलांच्या आठवणीत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे भावूक

एकमत ऑनलाईन

मुंबई : विधानसभेत विश्वासदर्शक ठराव जिंकल्यानंतर भाषणादरम्यान, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे मुलांच्या आठवणीत भावूक झाल्याचे पाहायला मिळाले.

माझा श्रीकांत डॉक्टर झाला. पण मी त्याला वेळ देऊ शकलो नाही. मी लेट यायचो आणि तो आधी निघून जायचा. मी संघटनेला वेळ दिला. शिवसेना हेच माझं कुटूंब मानलं. माझ्या आयुष्यात वाईट प्रसंग आला. माझी मुलं माझ्यासमोर डोळ्यासमोर गेली. तेव्हा मला दिघेंनी आधार दिला. असे सांगत एकनाथ शिंदे भावूक झाले. त्यांना यावेळी अश्रू अनावर झाले.

बंड का केलं? याचे कारण शोधणे गरजेचे होते. विधान परिषद निवडणुकीत मिळालेल्या वागणुकीमुळे अस्वस्थ होतो. माझे खच्चीकरण करण्याचा प्रयत्न केला. असे आरोप शिंदे यांनी यावेळी केले.

काय म्हणाले एकनाथ शिंदे?
शिवसेना भाजप युतीचे सरकार स्थापन झाले. गेले पंधरा दिवस, शिवसेनेचे चाळीस आमदार आणि अपक्ष दहा असे ५० आमदार माझ्यावर विश्वास ठेवून माझ्यासोबत राहिले. त्यांचे मी धन्यवाद मानतो. मला विश्वास बसत नाही, मी सभागृहात मुख्यमंत्री म्हणून बोलतोय.

आपण पाहिलं तर विरोधी पक्षातून सत्तेकडे जायची वाटचाल असते. मात्र, आज आपण ऐतिहासिक घटना पाहतोय. मला फडणवीस म्हणाले, फक्त देश नाही तर ३३ देशांनी या घटनेची नोंद घेतली आहे. सत्तेतून मी नगरविकास मंत्री होतो. अनेक मंत्री सरकार, सरकार मध्ये बसलेली मोठी माणसे एकिकडे आणि दुसरीकडे बाळासाहेबांचे शिवसैनिक.

मला अभिमान आहे, आमच्या पन्नास लोकांचे आम्ही मिशन सुरू केले तेव्हा कुठे निघालो आहे. किती दिवस लागतील. कुणीही विचारले नाही. मी मतदानादिवशी डिस्टर्ब होतो. मतदानादिवशी मला नीट वागणुक मिळाली नाही. असा आरोप करत मला जी वागणुक देण्यात आली ती सर्वांनी पाहिली आहे.
अन्ययाविरुद्ध बंड पुकारायचे ही बाळासाहेबांची शिकवण आहे. माझे कसे खच्चीकरण करण्यात आले हे सुनिल प्रभुंना माहिती आहे. त्यावेळी मी ठरवले लढून शहीद झालो तरी चालेल मात्र मागे हटणार नाही.

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या