औरंगाबाद : राज्याचा मंत्रिमंडळ विस्तार रखडला असताना राज्यातील राजकीय घडामोडींना वेग आला आहे.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे औंरगाबादहून आपला दौरा अर्धवट सोडून तातडीने दिल्लीला रवाना झाले आहेत. ते दिल्लीतील भाजपच्या पक्षश्रेष्ठींशी मंत्रिमंडळ विस्तारावर चर्चा करणार असल्याचे बोलले जात आहे.