मुंबई : महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उध्दव ठाकरे नेपोटिझम प्रॉडक्ट असल्याची टीका अभिनेत्री कंगना रानावत हिने सोमवार दि़ २६ आॅक्टोबर रोजी ट्विट करीत केली आहे.
शिवसेनेच्या दसरा मेळाव्यात पक्षप्रमुख व मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी विरोधकांना फैलावर घेतले होते़ उद्धव ठाकरेंनी मुंबईची तुलना पाकव्याप्त काश्मीरशी करत मुंबई पोलिसांवर टीका करणाºया अभिनेत्री कंगना रानावतवरही शरसंधान केले होते. उद्धव ठाकरे यांनी केलेल्या टीकेनंतर कंगना रानावतने प्रत्युत्तर दिले आहे. कंगनाने उद्धव ठाकरेंना तुम्ही घराणेशाहीमधून आलेले नेतृत्व असल्याचा टोला अप्रत्यक्षपणे लगावला आहे.
मुख्यमंत्री, मी तुमच्याप्रमाणे माझ्या वडिलांच्या सत्तेवर आणि पैशावर मोठी झालेली नाही. मला जर घराणेशाहीचे प्रोडक्ट व्हायचे असते तर मी हिमाचलमध्येच राहिली असते. मी एका प्रतिष्ठित कुटुंबातून येते. मात्र मला त्यांच्या मर्जीवर आणि संपत्तीवर राहण्याची इच्छा नव्हती. काही लोकांकडे स्वाभिमान आणि स्वत:ची संपत्ती असते, असे ट्विट कंगनाने केले आहे.
अन्य एका ट्विटमध्ये कंगनाने मुख्यमंत्रीपदाची खुर्चीही जाईल, असे विधानही केले आहे. महाराष्ट्रातील सध्याचे मुख्यमंत्री देशाच्या विभाजनाचे काम करत आहेत. त्यांना महाराष्ट्राचे ठेकेदार कोणी बनवले आहे. ते जनतेचे सेवक आहेत. त्यांच्या आधी दुसरे कोणीतरी होते. त्यांच्यानंतर दुसरे कोणीतरी जनतेची सेवा करेल. ते महाराष्ट्राचे मालक असल्यासारखे का वागत आहेत?, असे ट्विट कंगनाने केले होते.
बिहार विधानसभा निवडणुकीच्या पहिला टप्प्यातील प्रचार आज थंडावणार