30.8 C
Latur
Tuesday, March 2, 2021
Home महाराष्ट्र मुख्यमंत्र्यांची भाषा दुर्दैंवी : फडणवीस

मुख्यमंत्र्यांची भाषा दुर्दैंवी : फडणवीस

एकमत ऑनलाईन

राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या पत्राला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिलेल्या उत्तरावरुन विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनही टीका केली आहे. जामनेर येथे ग्लोबल महाराष्ट्र रुग्णालयाच्या उद्घाटनप्रसंगी फडणवीस महणाले की ,‘मुख्यमंत्र्यांनी राज्यपालांना ज्या भाषेत पत्र पाठवले आहे ते अतिशय दुर्दैवी आहे,राज्यपालांकडे जी निवेदने येत असतात, त्यासंबंधी पत्र लिहून ते मुख्यमंत्त्र्यांकडे पाठवत असतात. त्या पत्रांबाबत मुख्यमंत्र्यांनी योग्य तो निर्णय घ्यायचा असतो.

पण मुख्यमंत्री उद्धव यांनी ज्याप्रकारे पत्र पाठवले आहे, ते दुर्दैवी आहे,’’पुढे त्यांनी सांगितलं की, ‘‘शिवसेना स्वत:ला हिंदुत्ववादी पक्ष असल्याचे म्हणते. छत्रपती शिवाजी महाराजांची लढाई लढत असल्याचे सांगते. पण त्यांच्या सत्तेच्या काळात मंदिरांवर अन्याय होतो याबद्दल आश्चर्य वाटते मंदिरांमुळे केवळ भाविकांचीच आभाळ होते असे नाही तर त्याचा छोट्या व्यावसायिकांनाही फटका बसतो. त्यामुळे सरकारला सुबुद्धी मिळो आणि लवकरात लवकर मंदिरे उघडण्याचा निर्णय सरकारने घ्यावा,’’ असंही ते म्हणाले आहेत. ‘तीन पक्षांच्या सरकारमध्ये स्वत:ला हिंदुत्ववादी समजणारी शिवसेना देखील आहे. त्यांच्या राज्यात इतका मोठा अन्याय का?,’ असा सवाल देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी विचारला आहे.

भाजपाच्या मंदिर आंदोलनात सोशल डिस्टन्सिंगचा फज्जा

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,439FansLike
122FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या