अक्कलकोट: तडवळ (ता. अक्कलकोट) येथे बालविवाह होणार असल्याची माहिती मिळाल्यानंतर घटनास्थळी दाखल होऊन पोलिसांनी होणारा बालविवाह रोखला. हा प्रकार सोमवार, १३ फेब्रुवारी रोजी दुपारी घडला.
अधिक माहिती अशी की, तडवळ येथे बालविवाह होणार असल्याची माहिती सोलापूर येथील पोलिस नियंत्रण कक्षास मिळाली होती. यानंतर दक्षिण पोलिस ठाण्यात याबाबत निरोप देण्यात आला. त्यावरून पोलिस निरीक्षक महेश स्वामी, सपोनि बाळासाहेब काकडे, पोलिस नाईक नबीलाल मियावाले, सुरेश लामजाने, महिला पोलिस रेणुका कोळी, अर्चना मस्के, ग्रामविकास अधिकारी दयानंद खोबण यांचे पथक घटनास्थळी दाखल झाले.
यावेळी नातेवाइकांना ताब्यात घेऊन चौकशी केल्यानंतर खरा प्रकार पोलिसांच्या समोर आला. त्यानंतर नातेवाइकांना करजगी येथे आणून समुपदेशन करण्यात आले..