27 C
Latur
Saturday, August 13, 2022
Homeमहाराष्ट्रचित्रा वाघ यांना न्यायालयात खेचणार; नाना पटोले आक्रमक

चित्रा वाघ यांना न्यायालयात खेचणार; नाना पटोले आक्रमक

एकमत ऑनलाईन

मुंबई : काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांचा एका महिलेसोबतचा व्हीडीओ सध्या राजकीय वर्तुळात चर्चेचा विषय ठरत आहे. भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी हा व्हीडीओ ट्विट करत या सगळ्या चर्चेला तोंड फोडले होते. एवढेच नव्हे तर नाना पटोले यांनी त्यावर कोणतेही उत्तर न दिल्याने चित्रा वाघ यांनी बुधवारी पत्रकार परिषद घेत या सगळ्या वादाला आणखीनच हवा दिली होती.

त्यानंतर नाना पटोले हे चित्रा वाघ यांच्याविरुद्ध आक्रमक झाले आहेत. नाना पटोले यांनी चित्रा वाघ यांच्या आरोपांना जाहीरपणे प्रत्युत्तर दिले नसले तरी त्यांनी वाघ यांना न्यायालयात खेचण्याची तयारी सुरू केली आहे.

नाना पटोले यांनी नागपूरमध्ये प्रसारमाध्यमांशी बोलताना याबाबत माहिती दिली. महाराष्ट्रातील राजकारणाची पातळी खालावली असून माझी वैयक्तिक बदनामी करण्यासाठी ‘तो’ व्हीडीओ सोशल मीडियावर अपलोड करण्यात आला. यावर आमची कायदेशीर टीम तपासणी करत असून गरज पडल्यास न्यायालयातही जाण्याची आमची तयारी आहे, असे नाना पटोले यांनी सांगितले. त्यामुळे आता यावर चित्रा वाघ काय भूमिका घेतात, ते पाहावे लागेल.

चित्राताई, आधी ‘हे’ कार्यक्रम बंद करा, काँग्रेसच्या महिला नेत्याचा सल्ला
चित्रा वाघ यांनी आतापर्यंत माजी मंत्री संजय राठोड, शिवसेना नेते रघुनाथ कुचीक, राष्ट्रवादीचे नेते धनंजय मुंडे, मेहबूब शेख यासारख्या नेत्यांवर आरोप करत खळबळ उडवून दिली होती. या पार्श्वभूमीवर पत्रकारांनी कालच्या पत्रकार परिषदेत त्यांना ‘तुमच्याकडेच असे व्हीडीओ का येतात’ अशा आशयाचा प्रश्न विचारला. तेव्हा ‘का इंटरेस्ट आहे तुम्हाला या बातमीत पण?’ असा प्रतिप्रश्न चित्रा वाघ यांनी पत्रकारांना विचारला.

प्रश्न विचारला ती माझी चूक आहे का? वाघ
महाराष्ट्रामध्ये व्हायरल होत असलेल्या व्हीडीओचे स्पष्टीकरण मी मागितले. नानांनी यावर व्हीडीओ आपला आहे की नाही हे सांगायला हवं होतं. मात्र ते सांगत आहेत आम्ही कायदेशीर लढाई लढू. अगदी जरूर लढा, आम्ही देखील सर्व लढायला तयार आहोत, असे वाघ यांनी म्हटले. माझ्यावर सर्व काँग्रेसचे पदाधिकारी तुटून पडले आहेत. हे काँग्रेसचे कल्चर नाही असे सांगितले जातेय, मात्र मला घाण भाषेत बोललं जात आहे. मेसेज केले जात आहेत. मी प्रश्न विचारला ती माझी चूक आहे का? असेही त्यांनी म्हटले आहे.

व्हीडीओत नेमकं काय?
व्हीडीओत पाठमोरी दिसणारी व्यक्ती नाना पटोले असल्याचा दावा केला जात आहे. हॉटेलमध्ये एका महिलेसोबत बसल्याचा हा व्हीडीओ मेघालयातील चेरापुंजी येथील पोलो ऑर्किड हॉटेलमधील असल्याचा दावा केला जात आहे. चित्रा वाघ यांनी हा व्हीडीओ ट्विट करत नाना पटोले यांना सवाल विचारला होता, ‘काय नाना, तुम्ही पण झाडी, डोंगार आणि हाटीलात…’असे कॅप्शन लिहून चित्रा वाघ यांनी हा व्हीडीओ ट्विट केला होता.

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या