25.8 C
Latur
Thursday, September 29, 2022
Homeमहाराष्ट्रविनायक मेटे अपघात प्रकरणाची सीआयडी चौकशी करा

विनायक मेटे अपघात प्रकरणाची सीआयडी चौकशी करा

एकमत ऑनलाईन

मुंबई : शिवसंग्रामचे दिवंगत नेते विनायक मेटे यांचं अपघाती निधन झालं. हा अपघात घडल्यानंतर अनेक प्रश्न उपस्थित झाले त्यानंतर आता विनायक मेटे यांच्या अपघाती मृत्यू प्रकरणी सीआयडी चौकशीचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आदेश दिले आहेत. पोलीस महासंचालकांना मुख्यमंत्र्यांनी आदेश दिले आहेत.

विनायक मेटे यांच्या पत्नी ज्योती मेटे यांनी अपघाताच्या त्या दोन तासात काय झालं? याची चौकशी केली पाहिजे, अशी मागणी केली होती. अशातच आता सोशल मीडियावर एक ऑडिओ क्लिप व्हायरल केली जात आहे. या ऑडिओ क्लिपमधील आवाज विनायक मेटेंच्या अपघातापूर्वी त्यांच्यासोबत असलेले आणि त्यांचे निकटवर्तीय अण्णासाहेब मायकर यांचा असल्याचा दावा केला जात आहे. त्यानंतर मेटे यांच्या अपघाती मृत्यूची राज्य सरकारकडून गंभीर दखल घेण्यात आली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदेी सीआयडी चौकशीचे पोलीस महासंचालकांना मुख्यमंत्र्यांनी आदेश दिले आहेत.

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या