20.8 C
Latur
Friday, October 22, 2021
Homeमहाराष्ट्रचित्रपटगृहे, नाट्यगृहे २२ ऑक्टोबरपासून सुरू

चित्रपटगृहे, नाट्यगृहे २२ ऑक्टोबरपासून सुरू

एकमत ऑनलाईन

मुंबई : कोरोनामुळे राज्यात अनेक निर्बंध लागू करण्यात आले होते. त्याअंतर्गत सिनेमागृह, थिएटर्स बंद होती. आता सिनेमागृह, थिएटर्स सुरु करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली वर्षा या शासकीय निवासस्थानी महत्त्वाची बैठक झाली. यामध्ये थिएटर्स, सिनेमागृह २२ ऑक्टोबरपासून सुरु करण्याचा निर्णय झाला आहे.

राज्यातील चित्रपटगृहे आणि नाट्यगृहे २२ ऑक्टोबरपासून आरोग्याचे नियम पाळून खुली करण्यास परवानगी देण्यात येईल, असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी घोषित केले आहे. यासंदर्भात सविस्तर कार्य पद्धती एसओपी तयार करण्याचे काम सुरू असून ती लवकरच जाहीर करण्यात येईल. आज टास्क फोर्स सदस्य, खासदार संजय राऊत, मुख्य सचिव सीताराम कुंटे, अतिरिक्त मुख्य सचिव आरोग्य डॉ. प्रदीप व्यास तसेच निर्माते रोहित शेट्टी, कुणाल कपूर, मकरंद देशपांडे, सुबोध भावे, आदेश बांदेकर व नाट्य क्षेत्रातील मान्यवरांशी मुख्यमंत्र्यांनी बैठकीत चर्चा केली.

मनोरंजन सृष्टीतून ब-याच काळापासून थिएटर्स सुरु करण्याची मागणी होत होती. कलाकारांप्रमाणेच पडद्यामागे काम करणा-या लाखो लोकांचे रोजगार चित्रपट, नाटकांवर अवलंबून आहेत. चित्रपटसृष्टीसाठी मुंबईत सर्वात जास्त महत्त्वाची आहे. कारण मुंबईतून मोठ्या प्रमाणावर पैसा मिळतो. राज्य सरकारच्या तिजोरीतही मनोरंजन कराच्या रुपाने भर पडत असते.

कोरोना प्रतिबंधक नियमांचे पालन बंधनकारक
अनेक बडे सिनेमे प्रदर्शनाच्या प्रतिक्षेत आहेत. बॉलिवूडमधून रोहित शेट्टी हे मोठे नाव आहे. ते आजच्या बैठकीला उपस्थित होते. तिस-या लाटेचा धोका आता कमी झालाय. अनेक गोष्टी सुरु झाल्या आहेत. चित्रपटगृह, नाट्यगृहांमुळे सरकारच्या तिजोरीत कराच्या रुपाने चांगली रक्कम जमा होऊ शकते. राज्यातील अनेक ज्येष्ठ कलाकार त्यांना भेडसावणा-या आर्थिक संकटाबद्दल सोशल मीडियावर व्यक्त झाले आहेत. तसेच, थिएटर चालक, मालक आणि त्याच्याशी संबंधित कर्मचा-यांची मागणीही विचारात घेतली गेली नाही. यामुळे सध्या वाद सुरु झाला होता. देशातील इतर राज्यांमध्ये कोरोना प्रतिबंधक नियमांचे पालन करुन थिएटर सुरु करण्यात आले आहेत. त्यामुळे महाराष्ट्रातही थिएटर्स सुरु करण्याची मागणी केली जात होती.

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,527FansLike
195FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या