पुणे : माजी मंत्री संजय राठोड यांना पुणे पोलीस आयुक्तांनी पूजा चव्हाण मृत्यू प्रकरणी क्लीनचीट दिली, असे कळते. माजी मंत्री संजय राठोड यांच्या वरील आरोपाबाबत पोलीस अहवालाच्या मागणीसाठी पोहरादेवीचे ६ महंत बाबू सिंह महाराज, कबीरदास महाराज, सुनील महाराज, जीतू महाराज, यशवंत महाराज, शेखर महाराज आणि ऑल इंडिया बंजारा सेवा संघाचे अध्यक्ष शंकर पवार यांनी पुणे पोलिस आयुक्त अमिताभ गुप्ता यांची आज भेट घेतली. या भेटीत पुणे पोलिस आयुक्तांनी संजय राठोड निर्दोष असल्याची माहिती महंतानी दिली.
लवकरच मुख्यमंत्र्यांची भेट घेवून राठोड यांना मंत्रीपद पुन्हा द्यावे अशी मागणी सर्व महंत करणार आहेत. पूजा चव्हाण ही २२ वर्षीय मुलगी परळी, जिल्हा बीड येथील रहिवासी होती. पुण्यातील महंमदवाडी येथील हेवन पार्क या सोसायटीमध्ये राहत होती. पूजाने महाविकास आघाडी सरकारमधील मंत्री संजय राठोड यांच्यामुळे आत्महत्या केल्याची चर्चा होती. त्यांच्यावर गुन्हे देखील दाखल होते.