25.8 C
Latur
Thursday, September 29, 2022
Homeमहाराष्ट्रपवार यांची क्लिनचीट अद्याप कोर्टात प्रलंबित

पवार यांची क्लिनचीट अद्याप कोर्टात प्रलंबित

एकमत ऑनलाईन

मुंबई : एकीकडे मोहित कंबोज यांनी केलेल्या ट्वीटवरून राजकीय वातावरण तापले असतानाच दुसरीकडे तत्कालीन जलसंपदा मंत्री अजित पवार यांच्याबाबतची आणखी एक मोठी माहिती समोर आली आहे. अजित पवार यांना सिंचन घोटाळ््याच्या प्रकरणातून एसीबीकडून देण्यात आलेल्या क्लीनचिटचा रिपोर्ट अजूनही उच्च न्यायालयाने स्वीकारला नाही. त्यामुळे तो मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात प्रलंबित आहे. त्यामुळे भविष्यात अजित पवार यांच्या अडचणी वाढू शकतात, असे सांगितले जात आहे.

सूत्रांच्या माहित ीनुसार हा रिपोर्ट अजूनही कोर्टाने स्वीकारला नाही आणि फेटाळलाही नाही. कोर्टाने मागील २ वर्षांपासून हा रिपोर्ट प्रलंबित ठेवला आहे. अजित पवारांना २०१९ साली सिंचन घोटाळ््यातून क्लीनचिट दिली होती. परमबीरसिंग यांनी ही क्लीनचिट दिली होती. पण तो अहवाल अद्याप मुंबई उच्च न्यायालयाने स्वीकारला नसल्याचे समोर आले आहे. दोन वर्षांच्या काळात कोरोनाचा प्रादुर्भाव असल्याने हा अहवाल स्वीकारला नसल्याचे समोर आले आहे.

अजित पवारांना २०१९ साली सिंचन घोटाळ््यातून क्लीनचिट देण्यात आली होती. परमबीर सिंग यांनी ही क्लीनचिट दिली होती. पण तो अहवाल अद्याप मुंबई उच्च न्यायालयाने स्वीकारला नसल्याचे समोर आले आहे. त्यामुळे अजित पवार यांना पूर्णपणे या प्रकरणातून क्लीनचिट मिळाली नसून त्यांच्यावर अद्याप टांगती तलवार कायम असल्याचे स्पष्ट झाले आहे.

भाजपचे नेते मोहित कंबोज यांनी कालच एक ट्वीट करुन सिंचन घोटाळ््याचा पुन्हा एकदा तपास व्हावा, अशी मागणी केली होती. तसेच राष्ट्रवादीचा एक नेता लवकरच तुरुंगात जाणार असल्याचे त्यांनी म्हटले होते. त्यानंतर आज ही मोठी बातमी समोर आली आहे. अजित पवार यांना या प्रकरणात अडकवण्यासाठी हे देवेंद्र फडणवीस यांनी आखलेले षडयंत्र असल्याचे राष्ट्रवादीच्या नेत्या विद्या चव्हाण यांनी म्हटले आहे.

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या