नागपूर : मराठा आरक्षणाच्या पार्श्वभूमिवर अडचणीत सापडलेल्या पोलिस भरतीसंदर्भात राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी सोमवारी मोठी घोषणा केली असून, पोलिस भरतीचा मार्ग मोकळा झाला आहे. पोलिस भरतीबाबत उलटसुलट चर्चा सुरू असतानाच गृहमंत्र्यांनी पोलिस भरती घेणार असल्याचे घोषणा केली आहे. त्यामुळे पोलिस खात्यात १२ हजार ५३८ जागा भरण्याचा मोकळा झाला आहे.
पोलिस खात्यात १२,५३८ जागांसाठी भरती प्रक्रिया राबवण्यात येणार असल्याची घोषणा अनिल देशमुख यांनी केली. गृह विभागाने २०१९ मध्ये पोलिस भरतीचा निर्णय घेतला होता. त्यानुसार जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली होती. मात्र, ९ सप्टेंबर २०२० रोजी सर्वोच्च न्यायालयाने एसईबीसी आरक्षणाला अंतरिम स्थगिती दिल्याने पोलिस भरती प्रक्रिया थांबविण्यात आली होती. मात्र काही दिवसांपूर्वीच राज्य सरकारकडून एसीबीसीच्या आरक्षणाशिवाय राज्यातील पोलिस भरतीची प्रक्रिया पार पाडण्याचा निर्णय जाहीर केला होता.
दरम्यान राज्य सरकारच्या या निर्णयाला मराठा संघटना आणि नेत्यांकडून तीव्र विरोध दर्शविण्यात आला आहे. त्यामुळे पोलिस भरती प्रक्रियेवर अनिश्चिततेचे सावट निर्माण झाले होते. आता मात्र अनिल देशमुख यांच्या वक्तव्यामुळे गृह खाते आपल्या निर्णयावर ठाम असल्याचे दिसून येत आहे.
पहिल्या टप्प्यात ५३०० जागांसाठी भरती
पहिल्या टप्प्यात ५३०० जागांसाठी भरती प्रक्रिया पार पडेल. तर उर्वरित जागा या दुस-या टप्प्यात भरण्यात येतील, असेही गृहमंत्री देशमुख यांनी स्पष्ट केले. तसेच १२,५३८ जागा भरल्यानंतरही गरज पडल्यास पोलिस खात्यात आणखी कर्मचा-यांची भरती केली जाईल, असेही देशमुख म्हणाले. यावेळी त्यांनी केलेल्या वक्तव्यामुळे राज्य सरकार पोलिस भरतीच्या निर्णयावर ठाम असल्याचे संकेत मिळत आहेत.
तर आम्हीच कृषि कायद्यांना स्थगिती देऊ