मुंबई : व्यावसायिक व विकासकांकडून कोट्यवधी रुपयांची खंडणी वसूल केल्याचा आरोप असलेल्या जितेंद्र नवलानीला मुंबई पोलिसांनी क्लिनचिट दिली. शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी नवलानीवर अनेक गंभीर आरोप केले होते.
एसआयटीकडून याची चौकशीही सुरू होती. नवलानी ईडी अधिका-यांच्या नावाचा वापर करून बिल्डरांकडून पैसे वसुलीचे रॅकेट चालवित असल्याचा आरोप केला होता.