26.4 C
Latur
Friday, May 20, 2022
Homeमहाराष्ट्रफ्लश करण्यापूर्वी बंद करा टॉयलेटचे सीट कव्हर, अन्यथा पसरु शकतो कोरोना

फ्लश करण्यापूर्वी बंद करा टॉयलेटचे सीट कव्हर, अन्यथा पसरु शकतो कोरोना

एकमत ऑनलाईन

मुंबई : चीनच्या येंगझाऊ विद्यापीठाच्या शास्त्रज्ञांनी कोरोना व्हायरस हा मानवी शरीराच्या पचनसंस्थेत जीवंत राहू शकतो आणि मानवी विष्ठेद्वारे हा व्हायरस बाहेर पडू शकतो. अशावेळी तुम्ही जेव्हाही टॉयलेटचा वापर कराल त्यावेळी फ्लश करण्यापूर्वी टॉयलेटचे सीट कव्हर बंद करा. असे केल्याने कोरोनाचा प्रादुर्भाव रोखता येऊ शकतो, असा दावा केला आहे.

फिजिक्स ऑफ फ्लुईड्स नावाच्या जर्नलमध्ये प्रकाशित अभ्यासात समोर आले आहे की, पाणी आणि हवा या दोघांचे एका फ्लशिंग टॉयलेटमध्ये प्रवाह रोखण्यासाठी कम्प्यूटर मॉडलचा उपयोग केला जातो. त्यामुळे पाण्याचे छोटे थेंब हवेत बनतात आणि कोरोना या थेंबाद्वारे पसरु शकतो.

टॉयलेटचा वापर जेवढ्या वेळेस केला जातो. तेवढी भीती वाढते. पाणी आणि हवा मिळून पाण्याचे बारीक थेंब टॉयलेटला फ्लश केल्यानंतर तयार होतात. त्यामुळे बॅक्टेरिया आणि व्हायरस पसरण्याची शक्यता अधिक असते. ज्या घरात अधिक कुटुंब सदस्या आहेत. त्या घरात विषाणू पसरण्याची भीती अधिक आहे. अशामध्ये सर्वांनी एकच काळजी घेणे गरजेचे आहे की, टॉयलेटचा वापर केल्यावर फ्लश करताना कव्हर बंद करा, असे शास्त्रज्ञ जी शियांग वँग यांनी सांगितले.

नुकतेच सार्वजनिक शौचालयातून कोरोनाचा प्रादुर्भाव वाढू शकतो, असे केंद्र सरकारच्या आरोग्य विभागानेही सांगितल्यामुळे प्रत्येक झोपडपट्टी आणि चाळीत राहणाऱ्या रहिवाशांनी सावधानी बाळगत सार्वजनिक शौचालय स्वच्छ ठेवण्याची मोहिम सुरु केली आहे.

Read More  मृत्यूचे गूढ अखेर उलगडले : दारूच्या गुत्त्यासाठी वाघीणीची व बछड्यांची केली हत्या

Stay Connected

1,567FansLike
189FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या