24 C
Latur
Wednesday, October 5, 2022
Homeमहाराष्ट्रपुण्यात ढगफुटी, मुसळधार पावसाने रस्ते पाण्याखाली

पुण्यात ढगफुटी, मुसळधार पावसाने रस्ते पाण्याखाली

एकमत ऑनलाईन

पुणे : पुण्यात मुसळधार पावसाला सुरूवात झाली. मुसळधार पावसामुळे धनकवडी भागातील चव्हाण सोसायटीमधील पन्नास वर्षे जुने वडाचे झाड कोसळले असून यात कोणालाही दुखापत झालेली नाही. मात्र, सोसायटीत राहणारे अनिल पावसकर आणि त्यांचे कुटुंबीय त्यांच्या दारातच हे भले मोठे झाठ कोसळल्याने बाहेर येऊ शकत नाहीत. अग्निशमन दलाने झाड हटवण्याचे प्रयत्न सुरु केले आहेत. कोथरूडमध्ये देखील काही घरांमध्ये पावसाचे पाणी शिरले आहे.

गेल्या दोन दिवसांत पुणेकर उकाड्याने हैराण झाले होते. परंतु आज झालेल्या पावसामुळे आता हवेत गारवा निर्माण झाला. अचानक पाऊस सुरू झाल्याने नागरिकांची तारांबळ उडाली. मुसळधार पावसामुळे रस्त्यांवरून पाण्याचे लोंढे वाहत आहेत. रस्त्यांवर पाणी साठल्याने अनेक ठिकाणी वाहतूककोंडी झाली आहे. रस्त्यांवर पाणी साचल्याने वाहनांना अनेक अडथळ्यांना सामोरे जावे लागत आहे. आंबेगावतील गायमुख ओढापूल परिसरात रस्ता पाण्याखाली गेला.

मुसळधार पावसानंतर पुण्यातील कोथरूड परिसरातील कुंबरे पार्क या सोसायटीमध्ये मोठ्या प्रमाणात पाणी शिरले आहे. एका घराची भिंत पडली आहे. लोक घरातील पाणी बाहेर काढत आहेत. आळंदी रस्त्यावरील दिघी येथे ढग फुटी झाल्याने रस्त्यावर पाणी मोठ्या प्रमाण आले आहे. पाण्याचा प्रवाह एवढा आहे की पूर आल्यासारखे दृश्य दिसत होते.

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या