27.8 C
Latur
Thursday, October 21, 2021
Homeमहाराष्ट्रग्लोबल टीचर' पुरस्कार विजेते डिसले यांचा मुख्यमंत्र्यांकडून सत्कार !

ग्लोबल टीचर’ पुरस्कार विजेते डिसले यांचा मुख्यमंत्र्यांकडून सत्कार !

एकमत ऑनलाईन

मुंबई, दि.७(प्रतिनिधी) जागतिक स्तरावरील शिक्षण क्षेत्रातला सर्वोच्च पुरस्कार मिळवणारे रणजितसिंह डिसले यांचा महाराष्ट्राला अभिमान आहे. डिसले यांच्यासारखे नाविन्यपुर्ण उपक्रम राबवून व शिक्षण क्षेत्रात वेगवेगळे प्रयोग करणाऱ्या शिक्षकांना सोबत घेऊन शिक्षणाचा दर्जा वाढवण्यासाठी आराखडा तयार करावा असे निर्देश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज दिले.

मुख्यमंत्र्याच्या हस्ते युनेस्को व लंडनस्थित वार्की फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने दिला जाणारा ग्लोबल टीचर पुरस्कार मिळालेल्या रणजितसिंह डिसले यांचा शाल, श्रीफळ व सन्मानचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला.यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार, महसूलमंत्री बाळासाहेब थोरात, शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड, नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे, परिवहन मंत्री ॲड. अनिल परब, पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे उपस्थित होते.

यावेळी बोलताना मुख्यमंत्री ठाकरे म्हणाले की, डिसले यांनी शिक्षण क्षेत्रातील उत्तम कामाने हा पुरस्कार मिळविला आहे. एवढेच नव्हे तर त्यांनी पुरस्काराची रक्कम या स्पर्धेतील इतर नऊ स्पर्धकांमध्ये वाटून दिली आहे. त्यांनी केलेले कार्य हे ध्येय्यवेडाचे उदाहरण आहे. डिसले यांची शिक्षणक्षेत्रात काम करण्याची तळमळ यातून दिसून येते. कोविडनंतर शिक्षण क्षेत्रात अनेक आव्हाने उभी राहिली आहेत. मुंबई महानगरपालिकेतील शाळांमधून व्हर्च्युअल क्लासरूम ही संकल्पना राबविली गेली होती, याच धर्तीवर कोविडनंतरचे शिक्षण राज्यातील शेवटच्या विद्यार्थ्यापर्यंत पोहचविण्यासाठी डिसले यांच्यासारख्या तंत्रज्ञानस्नेही आणि नाविन्यपुर्ण विचार करणाऱ्या शिक्षकांची मदत घेऊन शिक्षण विभागाने काम करावे असेही मुख्यमंत्री ठाकरे यांनी यावेळी सुचविले.

जिल्हा परिषदेच्या शाळांतील शिक्षकांचे उत्तम काम ! -अजित पवार
सोलापूरसारख्या दुष्काळी समजल्या जाणाऱ्या भागातील जिल्हा परिषदेतील शिक्षकाने हा पुरस्कार मिळविला ही खरच अभिनंदनीय बाब आहे. या शाळांमधील काम उत्तम आहे याचा दाखला या पुरस्काराच्या रुपाने मिळाला आहे असे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सांगितले. उपमुख्यमंत्री म्हणाले, तंत्रज्ञानातील नाविन्यपुर्ण प्रयोग व असामान्य कार्य यामुळे जगातील सर्वोत्तम शिक्षकांच्या क्रमवारीत ते आले आहेत. जिल्हा परिषदेच्या शिक्षकाचा ग्लोबल चेहरा म्हणून त्यांच्याकडे पाहिले जाते. त्यांनी तयार केलेली क्यु आर कोडेड पुस्तके राज्यातील एक कोटीहून अधिक मुले वापरत असून जगभरातील देशातील शाळांमध्ये याची अंमलबजावणी सुरु आहे. विद्यार्थ्यांसाठी अधिक आनंददायी आणि ज्ञानवर्धक शिक्षण कसे देता येईल यासाठी शालेय शिक्षण विभागाने त्यांच्या ज्ञानाचा वापर करावा असेही पवार यांनी सांगितले.

इंग्रजी शाळांबरोबर स्पर्धा करणाऱ्या जिल्हा परिषदेच्या शाळा ! -थोरात
जिल्हा परिषदेच्या शाळांमधून जागतिक दर्जाचे शिक्षण दिले जात असून आता इंग्रजी शाळांबरोबर स्पर्धा करणाऱ्या शाळा म्हणून जिल्हा परिषदेच्या शाळा ओळखल्या जात आहेत. डिसले यांच्यासारख्या शिक्षकांमुळे इंटरनॅशनल म्हणवणा-या शाळांतील मुलेही एक दिवस परत जि. प शाळेत शिकायला येतील असा विश्वास महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी यावेळो व्यक्त केला. तर शैक्षणिक क्षैत्रात केलेल्या उल्लेखनीय कामगिरी करून महाराष्ट्राचे नाव देशातच नव्हे तर साऱ्या जगभर पोहचविणाऱ्या रणजितसिंह डिसले सरांच्या कार्याचा अभिमान वाटतो असे गौरवोद्गार शालेय शिक्षण मंत्री प्रा. वर्षा गायकवाड यांनी काढले.

पाणी असून पिके धोक्यात :दिवसाच्या भारनियमनाचा फटका

 

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,527FansLike
195FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या