22.4 C
Latur
Saturday, June 19, 2021
Homeमहाराष्ट्रगृहमंत्र्यांच्या चौकशीचे मुख्यमंत्र्यांकडून आदेश

गृहमंत्र्यांच्या चौकशीचे मुख्यमंत्र्यांकडून आदेश

एकमत ऑनलाईन

मुंबई : मुंबईच माजी पोलिस आयुक्त परमबीर सिंग यांनी गृहमंत्री अनिल देशमुखांवर केलेल्या आरोपांप्रकरणी चौकशी होणार आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी यासंदर्भात आदेश दिले आहेत. मुंबईचे माजी पोलिस आयुक्त परमबीर सिंग यांनी मुख्यमंत्र्यांना लिहिले. या पत्रात १०० कोटींच्या खंडणी वसुलीचे आरोप गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर केले आहेत. यावर चौकशी व्हावी, अशी मागणी अनिल देशमुख यांनी केली होती. आता यासंदर्भात अनिल देशमुख यांनी माहिती दिली आहे.

आपल्या मुंबईच्या माजी पोलिस आयुक्तांनी जे आरोप केले होते, त्या प्रकरणी आपण मुख्यमंत्र्यांकडे चौकशीची मागणी केली होती. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी ही मागणी मान्य केली आहे. या प्रकरणी हायकोर्टाच्या निवृत्त न्यायाधीशांद्वारे चौकशी करण्यात येणार आहे, असे अनिल देशमुख यांनी सांगितले. दरम्यान, शिवसेना नेते संजय राऊत यांनी सामनामधील रोखठोक सदरातून अनिल देशमुखांना कानपिचक्या दिल्या आहेत.

पोलिस अधिकारी सचिन वाझे हा खंडणी वसुली करत होता आणि गृहमंत्री अनिल देशमुखांना याची काहीच माहिती नव्हती, असा प्रश्न राऊत यांनी उपस्थित केला. पोलिस आयुक्त, गृहमंत्री, मंत्रिमंडळातील प्रमुख व्यक्तींचा लाडका आणि विश्वासपात्र ठरलेला वाझे हा एक फक्त सहायक पोलिस निरीक्षक होता. त्याला मुंबई पोलिसात अमर्यादित अधिकार कोणी दिले, असा सवालही अनिल देशमुखांना करण्यात आला.

राज्यात कोरोनाचा कहर, २४ तासांत तब्बल ४० हजार ४१४ नवे रुग्ण, १०८ जणांचा मृत्यू

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,527FansLike
203FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या