22.2 C
Latur
Friday, August 19, 2022
Homeमहाराष्ट्रसीएनजी ४ रुपयांनी महागले

सीएनजी ४ रुपयांनी महागले

एकमत ऑनलाईन

मुंबई : आधीच वाढलेल्या महागाईने त्रस्त असलेल्या मुंबईकरांना आता पुन्हा एक झटका बसणार आहे. महानगर गॅस लिमिटेडने सीएनजी दरात पुन्हा एकदा वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. सीएनजीच्या दरात चार रुपयांची वाढ झाली आहे तर पीएनजीच्या दरात ३ रुपयांची वाढ करण्यात आली आहे.

त्यामुळे मुंबईतील नागरिकांना आता सीएनजी ८० रुपये प्रति किलोने खरेदी करावा लागेल तर पीएनजीच्या दरातही वाढ होऊन तो ४८.५० रुपये करण्यात आला आहे. स्थानिक पातळीवर गॅसच्या सप्लायमध्ये कमतरता निर्माण झाल्याने हा निर्णय घेण्यात आल्याचे महानगर गॅस लिमिटेडने सांगितले आहे. वाढलेले नवीन दर हे मध्यरात्रीपासून लागू करण्यात आले आहेत.

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या