33.5 C
Latur
Monday, March 1, 2021
Home महाराष्ट्र सहकारी संस्थाच्या निवडणुका ३१ मार्चपर्यंत लांबणीवर !

सहकारी संस्थाच्या निवडणुका ३१ मार्चपर्यंत लांबणीवर !

एकमत ऑनलाईन

मुंबई दि. १८(प्रतिनिधी)- कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्यातील सहकारी संस्थांच्या निवडणुका ३१ मार्चपर्यंत पुढे ढकलण्याचा निर्णय राज्याच्या सहकार विभागाने घेतला आहे. कोरोना विषाणूचा संसर्ग लक्षात घेऊन राज्यातील सहकारी संस्थाच्या निवडणुका ३० सप्टेंबरपर्यंत पुढे ढकलण्याचा निर्णय यापूर्वी घेण्यात आला होता. पण सध्या कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. कोरोना आटोक्यात येण्यास काही काळ लागणार आहे.

अशा वेळी सहकार संस्थांच्य निवडणुका घेणे योग्य होणार नाही. या निवडणुका निर्भय, मुक्त व पारदर्शक वातावरणात घेण्याच्या दृष्टीकोनातून या निवडणुका ३१ डिसेंबर २०२०पर्यंत पुढे ढकलण्याचा निर्णय सरकारने घेतल्याचे सहकार विभागाने घेतला होता. आता पुन्हा ३१ मार्च २०२१पर्यंत पुढे ढकलण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. कोरोना आटोक्यात येण्यास अजूनही काळ लागणार आहे.

त्यामुळे निवडणुका पुन्हा पुढे ढकलण्यात येत असल्याचे राज्याच्या सहकार विभागाने आज प्रसिध्द केलेल्या आदेशात नमूद केले आहे. महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियमातील एका तरतुदीनुसार कोणत्याही नैसर्गिक आपत्तीमध्ये जनहिताच्या दृष्टीने सहकारी संस्थांच्या निवडणुका घेणे योग्य नाही. त्यामुळे राज्य सरकारकडे असलेल्या अधिकारांचा वापर करून राज्य सरकारकडे निवडणुका या निवडणुका पुढे ढकल्याण्याचा निर्णय घेण्यात आला आहे

एकाच कुटुंबातील चौघींवर मांत्रिकाचा बलात्कार

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,438FansLike
122FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या