16.8 C
Latur
Thursday, December 1, 2022
Homeमहाराष्ट्रतब्बल ९ कोटींचे कोकेन मुंबईत जप्त

तब्बल ९ कोटींचे कोकेन मुंबईत जप्त

एकमत ऑनलाईन

मुंबई : येथील विमानतळावर मोठी कारवाई करत कस्टमच्या पथकाने ९.८ कोटी रुपयांचे कोकेन जप्त केले. आदिस अबाबा येथून इथियोपियन एअरलाइन्सच्या फ्लाइट क्रमांक ईटी-६१० वरून मुंबई विमानतळावर आलेल्या प्रवाशाकडून सीमाशुल्क पथकाने ९.८ कोटी रुपयांचे ९८० ग्रॅम कोकेन जप्त केले आहे. या प्रकरणी एकाला अटक करण्यात आले आहे.

यापूर्वी म्हणजे २९ सप्टेंबर रोजीदेखील मुंबई विमानतळावर कस्टमच्या पथकाने ४९० ग्रॅम कोकेन घेऊन जाणा-या प्रवाशाला पकडले होते. जप्त करण्यात आलेल्या कोकेनची किंमत ४.९ कोटी रुपये होती. महिला प्रवाशाने तिच्या सँडलमध्ये बनवलेल्या एका खास छिद्रात कोकेन लपवून आणले होते.

कोकेन इतर पदार्थांसोबत मिसळून ते ब्लॅक कोकेन बनवले जाते. जेणेकरून धातूच्या साच्याच्या स्वरूपात किंवा अन्य काही स्वरूपात त्याची तस्करी करता येते आणि अमली पदार्थ विरोधी एजन्सीपासून संरक्षण होते.

Stay Connected

1,567FansLike
187FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या