30.2 C
Latur
Wednesday, March 3, 2021
Home महाराष्ट्र महाविद्यालयांच्या परीक्षा ऑनलाईनच - कोरोनाची भीती

महाविद्यालयांच्या परीक्षा ऑनलाईनच – कोरोनाची भीती

एकमत ऑनलाईन

पुणे : सगळ्यांच्या मनातून कोरोनाची भीती जाऊन प्रत्यक्ष परीक्षा देण्याची मानसिकता तयार होत नाही तोपर्यंत महाविद्यालयीन परीक्षा या ऑनलाईन पद्धतीनेच पार पडतील, असे वक्तव्य राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी केले. सध्या महाविद्यालये कधी सुरू होणार, असा प्रश्न सगळ्यांकडून विचारला जात आहे. विद्यापीठांशी चर्चा करून यासंदर्भात लवकरच निर्णय घेतला जाईल, अशी माहिती उदय सामंत यांनी दिली. ते रविवारी पुण्यात प्रसारमाध्यमांशी बोलत होते. यावेळी त्यांनी तूर्तास तरी महाविद्यालयीन परीक्षा ऑनलाईन पद्धतीनेच होतील, हे स्पष्ट केले. विद्यार्थ्यांनी महाविद्यालयात येऊन प्रत्यक्ष परीक्षा देण्यासाठी कोरोनाची साथ पूर्णपणे जाण्याची वाट पाहावी लागेल, असेही उदय सामंत यांनी सांगितले.

ओबीसी आरक्षण
एखाद्या घटकाला आरक्षण देताना दुस-या समाजाचे आरक्षण काढून घेतले जाणार नाही, हीच महाविकास आघाडीची भूमिका आहे. विजय वडेट्टीवार हे सातत्याने ओबीसी समाजाची भूमिका मांडत आहेत. मात्र, त्यावरून मंत्रिमंडळात कोणताही वाद नाही, असेही उदय सामंत यांनी स्पष्ट केले. महाविकास आघाडी शेतक-यांच्या आंदोलनात प्रत्यक्ष सहभागी झालेली नाही. तरीही आमचा शेतक-यांना पाठिंबा आहे. मी पुण्यातील काही शेतक-यांची भेट घेणार असल्याचे उदय सामंत यांनी सांगितले.

सुशीलकुमार शिंदे राष्ट्रीय नेते
शिवसेनेने काँग्रेससोबत येण्यास उशीर केला. उद्धव ठाकरे यांनी महाविकास आघाडी सरकारमध्ये येऊन खरे हिंदुत्व दाखवले, असे वक्तव्य काँग्रेसचे ज्येष्ठ नेते सुशीलकुमार शिंदे यांनी नुकतेच केले होते. त्यावर उदय सामंत यांना विचारणा करण्यात आली. तेव्हा उदय सामंत यांनी म्हटले की, सुशीलकुमार शिंदे हे राष्ट्रीय नेते आहेत. त्यांच्या विधानावर मी बोलणे योग्य नाही, असे सामंत यांनी स्पष्ट केले.

दहावी आणि बारावीची परीक्षा मे महिन्यात
राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने काही दिवसांपूर्वीच दहावी आणि बारावीच्या परीक्षांच्या तारखा जाहीर केल्या होत्या. दहावीची परीक्षा २९ एप्रिल ते ३१ मे या कालावधीत तर बारावीची परीक्षा २३ एप्रिल ते २९ मे या कालावधीत पार पडेल. कोरोनाच्या दृष्टीने आवश्यक ती खबरदारी बाळगून या परीक्षा घेतल्या जाणार आहेत.

चीनपेक्षा भारतीय लसीला पसंती

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,438FansLike
122FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या