मुंबई : उद्धव ठाकरे गटाचे आमदार नितीन देशमुख यांना एसीबीने नोटीस पाठविली आहे. १७ जानेवारी रोजी चौकशीसाठी हजर राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत. एसीबीची नोटीस आलेले नितीन देशमुख ठाकरे गटाचे तिसरे आमदार आहेत. राजापूरचे आमदार राजन साळवी आणि कुडाळ मालवण मतदार संघाचे आमदार वैभव नाईक यांना याआधी एसीबीने नोटीस पाठवली होती.
एकापाठोपाठ एका आमदाराला तपास यंत्रणा नोटीस पाठवत असल्यामुळे ठाकरे गटाची चिंता वाढली आहे.
देशमुख यांना १७ जानेवारी रोजी अमरावतीमध्ये हजर राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत. मालमत्तेची माहिती देण्यास सांगितले आहे. १७ तारखेला मी अमरावतीमधील कार्यालयात हजर राहणार आहे असे नितीन देशमुख यांनी सांगितले.